कळत-नकळत आपले विचार आपल्या आयुष्याला वळण देत असतात. आपले विचारच आपली दिशा ठरवतात. सरळ की खडतर वळणावर आपल्याला चालायचं आहे, हे आपल्या विचारांवरच अवलंबून असतं.
झाडावरची फुलं झाडावर असताना फार सुंदर दिसतात. एकदा का ती झाडावरून गळून खाली पडली, की ती पायदळी तुडवली जातात. नातेसंबंधांचंही तसंच असतं. म्हणून माणसांनी नात्यांना घट्ट पकडून ठेवावं.