Monday, 29 September 2025

नऊ महिने नऊ दिवस

जगात येण्यासाठी नऊ महिने आणि नऊ दिवस हे ठरलेले असतात; पण जगात आल्यानंतर कोणतीही वेळ निश्चित नसते. "अजूनही जगायचं आहे" असं सांगूनही श्वास ऐनवेळी निघून जातो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० सप्टेंबर २०२५

Friday, 26 September 2025

खंत

एक मोठी खंत आहे की, आयुष्य जगताना आपल्यासोबत कोणीच नसतं, पण अंत्ययात्रेला हजारो लोक उपस्थित असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ सप्टेंबर २०२५

Wednesday, 24 September 2025

मन मोकळं

नवरा-बायकोने एकमेकांना मनातील प्रत्येक गोष्ट सांगायला हवी, कारण मनस्ताप होण्यापेक्षा मन मोकळं झालेलं बरं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ सप्टेंबर २०२५

Tuesday, 23 September 2025

विश्वास संपादन

एखाद्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्याला स्वतः प्रामाणिकपणे वागावं लागतं, कारण खोटं फार काळ टिकत नाही.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ सप्टेंबर २०२५

Tuesday, 16 September 2025

मरणयातना

आई एकदाच जन्म देते, पण आयुष्यभर मरणयातना देण्यासाठी जग सज्ज असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ सप्टेंबर २०२५

Saturday, 13 September 2025

प्रेम आणि आदर

प्रेमाने आणि आदराने कमावलेली माणसं जवळ असतील, तर श्रीमंत असल्यासारखं वाटतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ सप्टेंबर २०२५

Wednesday, 10 September 2025

आपल्या हिमतीवर

आपण आपल्या विचारांनी आणि आपल्या हिमतीवर प्रत्येक गोष्ट कमावतो, म्हणून कोणाच्याही दबावाखाली राहण्याचं काहीच कारण नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० सप्टेंबर २०२५

Sunday, 7 September 2025

कामातील सातत्य

पाण्याचा एक-एक थेंब सतत पडत राहिल्यास पाषाणालाही भेगा पडतात. कोणत्याही कामात सातत्य असेल तर यश नक्की मिळते. म्हणून, यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहावे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ सप्टेंबर २०२५

Saturday, 6 September 2025

फूलपाखरू

चौदा दिवसांचं आयुष्य असलेलं फुलपाखरू निसर्गात मस्त बागडत दुसऱ्यांना आनंद देत जगतं. याउलट माणूस कित्येक वर्षं जगला तरी कधीच समाधानी होत नाही. कारण फुलपाखरू दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी जन्माला आलेलं असतं, तर माणूस स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ सप्टेंबर २०२५