Friday 22 February 2019

पोस्टमन काका

पोस्टमन काका

आनंद अश्रू येणं बंद झालं
शब्दातला चेहरा आठवताना
आठवणीत रमणे बंद झालं
दुरून आलेलं पत्र वाचताना

झोळीमधल्या सुख दुःखाचं
घरी येणं आता बंद झालं
भ्रमणध्वनीच्या काळामध्ये
पोस्टमनचं येणं बंद झालं

एक पत्र लिहून पाहूया
देऊया जगण्याला मोका
घेऊन पुर्वीचे युग तुम्ही
परत या पोस्टमन काका!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० फेब्रुवारी २०१९

Saturday 16 February 2019

विचार

आपण ज्या क्षणी ठाम असतो त्यावेळेस आपल्यावर आपला पुर्ण विश्वास असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ फेब्रुवारी २०१९

स्वार्थ

आपल्या डोळ्यांतील अश्रू
आपणच पुसायचे असतात
मदतीचे हात देणारे नेहमी
स्वार्थ का शोधत असतात?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ फेब्रुवारी २०१९