पैसा हा आपण आपल्या मर्जीने कमावतो व खर्च ही करतो. आणि संकटकाळी माणसं त्यांच्या मर्जीने आपल्या मदतीला धावून येतात. याचा अर्थ, पैशांसोबात माणसेही कमावता आली पाहिजे.
आपल्या हातून एखादी चूक झाली असेल तर विरोधक ती वाऱ्यासारखी पसरवतात. आणि याउलट असं ही आहे की आपल्या चांगल्या गोष्टीची वाच्यता करण्याची त्यांची हिंमतही होत नाही.
कोणी आपली चौकशी केल्यावर "बरं चाललंय" एवढं सांगून आपण शांत राहतो. पण त्याच ठिकाणी आपल्या जवळची आणि विश्वासातली व्यक्ती असेल तर आपण "खरी परिस्थिती" सांगून मन मोकळे करतो.