Saturday 23 November 2019

राजकारण

नातं, कुटूंब किंवा असो मित्र
नाही भरवसा राजकारणात
दबाव कधी तर कधी दगा
काहीही होतं येथे क्षणात


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२३ नोव्हेंबर २०१९

Friday 22 November 2019

लग्न

दोन मनांना व दोन कुटुंबाला एकत्र आणण्याचा सोहळा म्हणजे लग्न. एका नवीन नात्याच्या वळणावर मनात जबाबदारीची खूणगाठ बांधून विश्वासाचा हात पकडून नवीन जीवनात प्रवेश करणं म्हणजे लग्न.

आईच्या मायेने, बाबांचा आदर्श घेऊन वाढलेली लेक व खंबीर साथ असलेल्या भावाची दीदी सासरी जात आहे.


ओल्या झाल्या कडा बापाच्या
करत असता लेकीची पाठवण
गंगा यमुनाही आईच्या नयनी
मनातही आठवणींची साठवण

निघाली आहे नवरी सासरी
संभाळण्यास भार संसाराचा
नकोस करू काळजी पोरी
भाऊ आहे खंबीर आधाराचा

लेक चालली पहा सासरला
सुरू करण्यास संसार नवा
नवीन आयुष्याच्या प्रारंभास
थोर मंडळींचा आशिर्वाद हवा



यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२३ नोव्हेंबर २०१९

Sunday 17 November 2019

मन माझं जडलेलं

खूप सांगायचं तुला, मनात सारं दडलेलं
सांग कळणार कधी, मन माझं जडलेलं

दोन पाखरं डोळ्यांची, फिरे तुझ्या भोवती
भेट होताच आपली, श्वास क्षणास रोखती
सत्य आहे कि भास, जणू स्वप्न पडलेलं
सांग कळणार कधी, मन माझं जडलेलं

वेडावून मज जाते, तुझे लाजून हासणे
काळीज चिरून जाते, तुझे चोरून पाहणे
येऊ दे ओठावरी, डोळ्यात सारं दडलेलं
सांग कळणार कधी, मन माझं जडलेलं

खूप सांगायचं तुला, मनात सारं दडलेलं
सांग कळणार कधी, मन माझं जडलेलं

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१७ नोव्हेंबर २०१९

Sunday 3 November 2019

आत्मपरीक्षण

स्वतःचं शारीरिक रूप पाहण्यासाठी आपण आरशात पाहतो. त्याचप्रमाणे आपल्याला  आत्मिक रूपही असतं. ते पाहण्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज असते. हे आत्मपरीक्षण व्यवस्थित झालं तर स्वतः बरोबर संपूर्ण जगही सुंदर दिसायला लागतं.



यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०३ नोव्हेंबर २०१९