Wednesday 9 December 2020

जाणीव

जाणीव व संवेदनामध्ये परिस्थिती सत्यात उतरवण्याची ताकत असते. म्हणून वर्तमानात चांगल्या विचारांची जाणीव व संवेदना असल्यास आपल्या जीवनात आनंदाचे क्षण येत असतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ डिसेंबर २०२०

Saturday 5 December 2020

विचार

वर्तमानात आपली जी परिस्थिती आहे, आपण जे जीवन जगतो आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे आपले विचार आहे. 

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ डिसेंबर २०२०

Tuesday 1 December 2020

विचार मनातील

विचार मनातील

विचारांच्या लहरी ठरवते
जगणं आपलं आयुष्यातील 
आपल्याच हाती सारं आहे
मार्ग ठरविणं जगण्यातील

विचार म्हणजे सर्व काही
त्यावर घडत असे पुढचे
विश्वास असे स्वतः वर
जवळ भासे यश दुरचे

मनात खेळ नित्याने चाले
चांगल्या वाईट विचारांचा
विचारांच्या विचारावर असे
संकेत आपण असण्याचा


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२९ नोव्हेंबर २०२०