Sunday 25 April 2021

बाजार श्वासांचा

बाजार श्वासांचा

पैसे मोजावे लागतात हल्ली
एक एक श्वास घेण्यासाठी 
स्वतःच जबाबदार होतोय
आपण आपल्या मरणासाठी

नैसर्गिक गोष्टी संभाळण्यास
माणूस कमजोर ठरला आहे
नात्यांचा जीव वाचवण्यास
बाजार श्वासांचा भरला आहे

श्वासच हे अंतीम सत्य आहे 
देहास जिवंत ठेवण्यासाठी
महत्त्वाचा ठरतो प्राणवायू 
एक एक क्षण जगण्यासाठी  


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ एप्रिल २०२१

Sunday 18 April 2021

राग - एक हत्यार

एका माणसाला दुसऱ्या माणसापासून तोडून दूर करणारं हत्यार म्हणजे "राग" आहे.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ एप्रिल २०२१

Friday 9 April 2021

जगून थोडं पाहायचं आहे

मनाचे शब्द शांत ऐकून 
जगून थोडं पाहायचं आहे
"नाही" हा शब्द विसरून 
जगणं सारं जगायचं आहे


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० एप्रिल २०२१

Saturday 3 April 2021

हक्काची माणसं

घरापासून दूर गेल्यावर आपल्या माणसांची व घराची ओढ लागते तेव्हा समजून जायचं कि आपण हक्काची माणसं कमाविण्यास यशस्वी झालो आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ एप्रिल २०२१