कान तर स्वतःचे असतात पण त्या कानात दुसऱ्यांचे विचार शिरल्यावर ते मनाला स्पर्श करण्याअगोदर त्यातल्या अस्वस्थ करणाऱ्या विचारांना दूर केलं पाहिजे. शब्द थेट मनावर परिणाम करत असतात.
आरसा पाहिल्यास चेहऱ्यावर डाग दिसले तर ते धुवून पुसून घ्यावे. चेहऱ्यावर डागच का दिसले म्हणून कोणी आरसा फोडत नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःचं नुकसान करणारी मंडळी या जगात अजूनही आहेत.