Friday 31 December 2021

चांगुलपणा

नवीन ओळख किंवा जुनी नाती टिकून राहण्यासाठी आपला चांगुलपणाच कामी येतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३१ डिसेंबर २०२१

Wednesday 29 December 2021

पेटलेली जिद्द

आपलं मन खंबीर आणि जिद्द पेटलेली असेल तर आपल्याला प्रत्येक चांगल्या कार्याचा भडका झाल्याशिवाय राहणार नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२९ डिसेंबर २०२१

Tuesday 28 December 2021

माणुसकी

जेथे माणुसकी नांदत असते तेथे दुःखाला मुळीच जागा नसते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२८ डिसेंबर २०२१

भावनिक जगणे

भावनिक जगणे

जमवलंय जेवढं आयुष्यात 
सोडून मागे सारे जाणे आहे
खर्चिले आयुष्य खऱ्यांसाठी
बाकी सारे खोटे नाणे आहे

जगण्यासाठी फक्त आपणास  
माया आणि प्रेम आधार आहे
आपलाच घेतात फायदा सारे 
इतरवेळी आपला भार आहे?

सोबत राहून सार्‍यांच्या नेहमी
जगणे आपले भावनिक झाले
जग सोडून गेल्यावर आपला
विसर पडणे स्वाभाविक झाले

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२८ डिसेंबर २०२१

Monday 27 December 2021

शांतता

नाते बिघडल्यावर ते दुरूस्त करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे आपली स्वतःची शांतता आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२७ डिसेंबर २०२१

Saturday 25 December 2021

जमिनीवर इमारती उगवल्या जात आहेत

जमिनीवर इमारती उगवल्या जात आहेत आणि त्याच इमारतीत गच्चीवर, खिडकीत एक छोटंसं रोपटं शोभेसाठी ठेवण्यात येत आहे.

वाह रे माणसा!

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२६ डिसेंबर २०२१

नवीन संधी

कालच्या दिवसाने दिलेली संधी नकळत आपल्या हातातून निसटून गेलेली होती. त्यासाठी राहीलेले प्रयत्न पुर्ण करण्यासाठी पुन्हा नवीन कल्पना घेऊन आजचा दिवस आपल्या मदतीला नवीन रूपात नवीन संधी घेऊन येत असतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२६ डिसेंबर २०२१

Friday 24 December 2021

गोतावळा

माणसं आपल्या ताब्यात राहत नाहीत पण आपलं मन आपल्या ताब्यात असलं की आपल्या भोवती गोतावळा नक्कीच वाढतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२४ डिसेंबर २०२१

Thursday 23 December 2021

दुःखी होणं हे स्वाभाविक आहे

आपण दुःखी होणं हे स्वाभाविक आहे कारण आपल्या मनात रोज येणाऱ्या हजारो विचारांपैकी बर्‍याच विचारांवर काम करायचं राहून जातं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२३ डिसेंबर २०२१

Wednesday 22 December 2021

मन

आपली माणसं आपल्या मनासारखी वागली नाही तर मनावर विचित्र आघात होतो. हा आघात सहन करण्यासाठी आपण आपल्या मनावर ताबा ठेऊन मनाला समज दिली पाहिजे.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२२ डिसेंबर २०२१

Tuesday 21 December 2021

संपर्क

आपलं सर्व सुरळीत सुरू असतं तेव्हा नवीन ओळख तर घडतेच, त्याचबरोबर कधीकाळी संपर्कात राहिलेली व्यक्ती सुद्धा पुन्हा आपल्या संपर्कात राहण्याचा खूप प्रयत्न करीत असते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२१ डिसेंबर २०२१

Monday 20 December 2021

लोक काय म्हणतील?

मनात आलेल्या विचारांवर आपण विचार न करता, "लोक काय म्हणतील?" या सारख्या विचाराला खतपाणी घातले तर आपली प्रगती खुंटते. 


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२० डिसेंबर २०२१

Saturday 18 December 2021

समाधान

जेव्हा आपण केलेल्या कामावर आपण स्वतः पुर्णपणे समाधानी असू तेव्हा आपले कार्य हे लोकांच्या पसंतीस उतरण्यास सुरूवात होते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१९ डिसेंबर २०२१

विचार आयुष्य घडवतात

देवाकडे आपण सुखी जीवनासाठी आशिर्वाद मागत असतो पण आपण आपल्या विचारांवर आपले आयुष्य घडवत असतो याचा अर्थ असा होतो की आपणच आपले देव आहोत.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१८ डिसेंबर २०२१

Thursday 16 December 2021

विचारांचे स्वागत

कोणत्याही परिस्थितीत आपल्या विचारांचे स्वागत फक्त आपली लेखणीच करू शकते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१६ डिसेंबर २०२१

Wednesday 15 December 2021

परिस्थिती

परिस्थितीनुसार स्वतःला बदलता येत नसेल तर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ शकतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१५ डिसेंबर २०२१

लेखणी

लेखणी

लेखणीतून सजवलेल्या शब्दाने 
बर्‍याच जणांचे आयुष्य घडवले
दोष कसा द्यावा याच लेखणीला
कोर्टात कधी फासावर चढवले

गुंफून शब्दाचा दागिना अनमोल
साहित्यिक जगाला साज चढतो
वर्षानुवर्ष कायम लक्षात राहणारा
याच लेखणीतून इतिहास घडतो

वाटा मनाच्या मोकळ्या होताना
लेखणीतून घडतो जादुई प्रवास
सुखदुःख कागदावर मांडताना
सुखद भासे लेखणीचा सहवास


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१५ डिसेंबर २०२१

Monday 13 December 2021

कष्टाची जाणीव

आईवडीलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव असली असती तस एकही वृध्दाश्रम सुरू करण्याची गरज भासली नसती.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ डिसेंबर २०२१

Saturday 11 December 2021

प्रेरणा

माणसाला ज्यावेळेस प्रेरणा मिळते त्यावेळेस तो आपल्यातले लपलेले गुण जगासमोर मांडतो आणि लोकांमध्ये विशेष स्थान निर्माण करतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१२ डिसेंबर २०२१

Friday 10 December 2021

सुंदर मन

शरीराच्या सौंदर्यापेक्षा मनाने सुंदर असणारी व्यक्ती आपल्या मनात तिचे स्वतःचे स्थान घट्ट करून राहत असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
११ डिसेंबर २०२१

मनाला जखम होणारी धार

कमी बोलणारी माणसं शब्द विचार करून वापरतात. त्यांच्या शब्दात मनाला जखम होणारी धार नसते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१० डिसेंबर २०२१

Wednesday 8 December 2021

यशाचे श्रेय

आपल्या प्रत्येक यशाचे श्रेय हे आपल्या आत्मविश्वासाला जाते. कारण ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे त्याला यशाचे मार्ग सहजच सापडतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८ डिसेंबर २०२१

Tuesday 7 December 2021

गैरसमज

आपल्यातील गैरसमज हे नात्याला दुभंगणारे एकमेव कारण आहे. यावर आपला समजूतदारपणा हाच खरा रामबाण उपाय आहे.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०७ डिसेंबर २०२१

Monday 6 December 2021

जाणीव

आईच्या गर्भातून या जगात आलेल्या प्रत्येकाला हे माहीतच आहे की आपला शेवट स्मशानात राख होऊनच होणार आहे. तरीदेखील राग, कपट, द्वेष, रूसवा याला थारा देऊन आपल्यासोबत दुसर्‍यालाही त्रास होईल असे माणूस का वागत असतो?

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०६ डिसेंबर २०२१

Wednesday 1 December 2021

प्रेमाची कबुली

तिने प्रेमाची कबुली देताना 
पाऊस हळूच सावरला होता
चिंब भिजलेली असताना ती
मी श्वास रोखून धरला होता


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०१ डिसेंबर २०२१

जगण्याचा मार्ग

खरी वागणारी माणसं आयुष्यात आपल्यासोबत असतील तर आपला जगण्याचा मार्ग कधीच चूकत नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०१ डिसेंबर २०२१