Saturday, 31 August 2024

स्वतःचा दृष्टीकोन

माणसं आणि त्यांच्या स्वभावात बदल घडावा म्हणून खूप प्रयत्न केले पण काही फरक पडला नाही. शेवटी स्वतःचा दृष्टाकोन बदलावा लागला.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ ऑगस्ट २०२४

Thursday, 29 August 2024

डोळ्यातून वाहणारे अश्रू

डोळ्यातून वाहणारे अश्रू खरे की खोटे आहेत हे स्वतःच्या डोळ्यांना सुद्धा कळत नाही तर समोरच्या व्यक्तीला तरी कसं कळणार!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ ऑगस्ट २०२४

Wednesday, 28 August 2024

आपली माणसं

सुखात तर सगळेच आपले वाटेकरी असतात पण जे दुःखात पळवाटा न शोधता शेवटपर्यंत आपल्या सोबत असतात तीच खरी "आपली माणसं"

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ ऑगस्ट २०२४

Sunday, 25 August 2024

श्वास कमी होत आहे

स्वतःचा श्वास कमी होत आहे हे माहीत असूनही काहीजण दुसऱ्यांची काळजी करत जगत असतात. याच आनंदात त्यांना खूप जगल्यासारखं वाटतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ ऑगस्ट २०२४

Tuesday, 20 August 2024

मनाचा आवाज

इतरांच्या बोलण्याकडे जरी आपण लक्ष देत असलो तरी सुद्धा मनाचा आवाज ऐकला पाहिजे. कारण असे केल्याने पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही व वैयक्तिक, कौटुंबिक होणारे नुकसान टळून जाते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० ऑगस्ट २०२४

Monday, 19 August 2024

विरोधकाच्या मनाची तडफड

माणूस जितका शांत राहून संकटातून मार्ग मोकळा करत असतो त्याच्याहून कित्येक पटीने विरोधकाच्या मनाची तडफड जास्त होत असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ ऑगस्ट २०२४

Sunday, 18 August 2024

आपल्याला मृत्यू शोधत येत आहे

"आपल्याला मृत्यू शोधत येत आहे" याचा खरा अर्थ ज्या व्यक्तीला समजला असेल, ती व्यक्ती काही न गमावता बिंधास्त जगत असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ ऑगस्ट २०२४

Wednesday, 14 August 2024

विचाराचं स्वातंत्र्य

विचाराचं स्वातंत्र्य असेल तर सध्यस्थितीत असलेल्या अडचणीतून मुक्तता करून घेता येते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ ऑगस्ट २०२४

Saturday, 10 August 2024

परिस्थितीचा सामना

परिस्थितीचा सामना करताना आपण भानावर असणे गरजेचं असतं. कारण शांत मनाने घेतलेल्या निर्णयाने माणूस घडतो आणि रागात घेतलेल्या निर्णयाने मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० ऑगस्ट २०२४

मृत्यू झाल्यावर

आपला मृत्यू झाल्यावर आपण काहीही घेऊन जात नाही. तरी सुद्धा जीवन जगताना माणूस माझं माझं करून जगत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० ऑगस्ट २०२४

Sunday, 4 August 2024

प्रामाणिकपणा व स्पष्टता

आपल्या वागण्यात प्रामाणिकपणा व स्पष्टता असेल तर लोकांचा विश्वास संपादन करण्यास मदत होते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ ऑगस्ट २०२४

Thursday, 1 August 2024

मृत्यू शोधत येत आहे

आपल्याला मृत्यू शोधत येत आहे. आपण त्याला सापडेपर्यंत अडचणीच्या काळातही सुखाचा शोध घेत जगता आलं पाहिजे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ ऑगस्ट २०२४