Friday, 31 October 2025

चिंतेत गुरफटलेला

प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या चिंतेत गुरफटलेला असतो, आणि ती चिंता वाढतच जाते. मात्र मनावर ताबा ठेवला आणि विचार सुंदर ठेवले, तर वयाचं भान विसरून बिनधास्त जगता येतं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०१ नोव्हेंबर २०२५

Tuesday, 28 October 2025

पाणी आणि नातं

पाणी आणि नातं यात एक साम्य आहे— गढूळ पाणी पिल्यानंतर तब्येत बिघडते, आणि नातं गढूळ झाल्यावर जगणंच बिघडून जातं!


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२८ ऑक्टोबर २०२५

Thursday, 23 October 2025

एक एक श्वास

आपला एक एक श्वास कमी होत असताना चिंता वाढत जाणं स्वाभाविक आहे. म्हणून दुःख विसरण्यासाठी आनंद वाढवणाऱ्या गोष्टींचा पाठलाग करणं आवश्यक असतं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२३ ऑक्टोबर २०२५

Wednesday, 22 October 2025

अंत्ययात्रेला गर्दी

स्वतःच्या अंत्ययात्रेला गर्दी व्हावी, या विचाराने दुसऱ्यांच्या अंत्ययात्रेत नाइलाजाने सहभागी होऊन आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न स्वार्थी लोकच करतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२२ ऑक्टोबर २०२५

Friday, 17 October 2025

योग्य मार्ग

जो आपली दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करतो, त्याला त्याचा योग्य मार्ग दाखवावा लागतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ ऑक्टोबर २०२५

Thursday, 16 October 2025

ध्येयापर्यंत पोहचता येतं

रस्ता डोळ्यांना जिथपर्यंत दिसतो, तिथेच संपतो असं समजून डोळ्यांना दोष द्यायचा नसतो. एक-एक पाऊल पुढे टाकत गेल्यावर आपल्याला ध्येयापर्यंत पोहचता येतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ ऑक्टोबर २०२५

Friday, 10 October 2025

विचारांवर आधारित

अडचणी या दुसऱ्यांमुळे निर्माण होत नाहीत; त्या आपल्या स्वतःच्या विचारांवर आधारित वागणुकीतून निर्माण होतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ ऑक्टोबर २०२५

Thursday, 9 October 2025

स्वतःची मतं

प्रत्येकाला स्वतःची मतं असतात. जी व्यक्ती स्वतःची मतं मांडू शकत नाही, ती दुसऱ्याच्या दबावाखाली वावरत असते. दुसऱ्यांच्या विचारांवर चालणारा माणूस कधीच यशस्वी होत नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ ऑक्टोबर २०२५

Wednesday, 8 October 2025

बिंधास्त

आपण पाहत असलेलं स्वप्न हे दुसऱ्याला दिसत नाही. म्हणून बिंधास्त राहून ते साकार करावं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८ ऑक्टोबर २०२५

Sunday, 5 October 2025

छत्तीस गुण

छत्तीस गुण जुळले आहेत या विचाराने काही दिवस संसार व्यवस्थित चालतो. पण जेव्हा वादविवाद घडायला लागतात, तेव्हा पत्रिकेवर दोष न देता जोडीदारातील गुण शोधता आले पाहिजेत.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ ऑक्टोबर २०२५

Saturday, 4 October 2025

आपण पाहत असलेलं स्वप्न

आपण पाहत असलेलं स्वप्न दुसऱ्यांना दिसत नाही; म्हणून ते पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांचा विचार न करता पुढे जात राहणं गरजेचं असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ ऑक्टोबर २०२५