Wednesday 29 November 2017

गझल

एक शेर

विश्वास फार होता ज्याच्यावरीच माझा
त्यानेच "हाय" केला पाठीत वार माझ्या

Sunday 19 November 2017

....पत्र हरवलं

    पुर्वी आम्ही पोस्टमन काकाची खुपच वाट पाहत असे.  कारण, ताईच पत्र येणारं असतं. ताई आम्हाला आठवड्यातून दोनदा तरी पत्र लिहायची. आम्हीही तिला पत्राचे उत्तर लगेच पाठवत असे. पत्र वाचताना माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत असत कारण तो वेगळाच आनंद असायचा. ती एक माया, ममता होती. पत्रातील प्रत्येक अक्षरात ताईचा चेहरा दिसत असे. रात्रीचे जेवण व सर्व आवरून झाले की आम्ही सर्वजण एकत्र बसून पत्र लिहत असे. तो अनुभव फार वेगळाच होता. आई-पप्पा पत्राचा मजकूर सांगत असत व ते मी लिहायचं काम करायचो. खुप छान वाटायचं पत्र लिहताना. आम्ही तर पोस्ट ऑफिसमधून अंतरदेशीय पत्र व पोस्ट कार्ड खुप आणून ठेवायचो.

    आता ते सारे दिवस बदलले आहे. पोस्टमन काकांची क्वचितच भेट होते. त्यांच्या हातात पत्र असतात पण बहुतेक सरकारी कामकाजाची. आम्ही पुर्वी पत्र लिहायचो ते म्हणजे नाती जोडण्यासाठी आणि आता कोर्टाकडून पत्र (नोटीस) पोस्टमन काकाकडे आलेली असतात ते म्हणजे संसार मोडण्यासाठी. खुप अवघड परिस्थिती आहे. आजच्या काळात कोणीही दूरच्या नातेवाईकांना पत्र लिहिताना पाहीलं नाही. पत्र लिखाण फार कमी झालंय (पत्र लिखाण थांबलेच आहे असं म्हणायला हरकत नाही).  आजच्या काळात आठवण आली की सरळ फोन उचलतात आणि दोन शब्द बोलून मोकळे होतात. आजच्या टेक्नाॅलाॅजीच्या युगात नवेनवे स्मार्ट फोन येत आहेत. समोरच्या व्यक्तीला जरी मोबाईल वरून संदेश पाठवायचा असेल तर लिखाण कमी व चिन्हच (emoji) जास्त असतात. एवढं जग व्यस्त/कामात गुंतलेला असतो. या अशा काळात पत्र हरवलं आहे.

    आपण जे कधी प्रत्यक्ष बोलू शकत नाही ते पत्राच्यारूपात मत मांडल्यावर मनावरचं ओझं हलकं होतं. मुख्य म्हणजे आपल्या हातून काहीतरी लिखाण झालं आहे याचा आनंद आपल्याला मिळतो. चला मग थोडा वेळ काढून पत्र लिहूया. पहा किती धम्माल येईल.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ नोव्हेंबर २०१७

Friday 17 November 2017

कादंबरी

संदर्भ: wikipedia

कादंबरी

साधारणत: अधिक लांबीचे काल्पनिक कथा असलेले गद्यलेखन यास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात ७व्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji ही पहिली कादंबरी ११व्या शतकात लिहिली गेली.

कादंबरी या साहित्य प्रकारचे स्वरूप

कादंबरी ह्या साहित्य प्रकाराला अभ्यासताना त्यासाठी असणार्या करार, काळ,आवाज या संकल्पनाही लक्षात घ्याव्या लागतात. डॉ. मिलिंद मालशे यांनी दिलेल्या साहित्याच्या पायाभूत करार या संकल्पनेनुसार ‘कथन करणे’ हा कादंबरीचा करार सांगितला जातो. म्हणजेच कथानात्मक या साहित्याच्या मुलभूत प्रवृत्तीत ‘कादंबरी’ हा प्रकार मोडतो. यातून कादंबरीकार त्याने अनुभवलेल्या जीवनाचे त्रयस्थपणे कथन करत असतो. म्हणून या प्रकाराला आत्मनिष्ठ म्हणता येत नाही. कादंबरीत येणाऱ्या या जीवनपट एका विशिष्ट काळाचे दर्शन घडवत असतो. कादंबरीत येणारा हा ‘काळ’ सुझन लँगरच्या ‘काळ’ यासंकल्पनेनुसार प्रतीभाषिक भूतकाळ असतो. कादंबरी ही कथनात्मक स्वरुपाची असल्याने कादंबरीकार त्यातील व्यक्तिरेखांविषयी सांगत अस्तोसतो. म्हणजे टी. रास इलियट च्या आवाजाच्या संकल्पनेनुसार कादंबरीचा ‘दुसरा आवाज’ असतो.

कादंबरी, लघुकादंबरी आणि दीर्घ कादंबरी

लघुकादंबरी म्हणजे कादंबरीच- फक्त लघू असे नाही. लघुकादंबरी ही तिच्या मुळापासूनच एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. १८७२ साली विनायक कोंडदेव ओक यांनी 'शिरस्तेदार' लिहिली तेव्हापासूनच मराठीत हिचा आरंभ झाला. व्यक्ती आणि समाज यांचे यथार्थ चित्रण असलेल्या लाचखाऊ मामलेदाराच्या या आत्मपरीक्षणात्मक कहाणीला तेव्हा छोटेखानी कादंबरी संबोधले गेले होते. केवळ आकाराच्या दृष्टीने हा छोटेपणा नसून यात एकूणच लघुत्व आहे, व ते पुढे कसेकसे विकसित होत गेले हे पाहणे महत्त्वाचे आहे. लघुकादंबरी लिहिण्यासाठी लघुकथा, दीर्घकथा आणि नेहमीची कादंबरी विचारात घ्यावी लागते.

कथा-दीर्घकथा, लघुकादंबरी-कादंबरी असे म्हणण्यानेच जाणकार वाचकाच्या मनात त्यांतील भेद लक्षात येतो. पण कधीकधी लेखकाचीच द्विधा मन:स्थिती होते.'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' ही ह.मो. मराठे यांची लघुकादंबरी १९६९ साली साधनाच्या दिवाळी अंकात दीर्घकथा म्हणून प्रसिद्ध झाली. तिला पुस्तकरूप देताना मात्र लेखकाने आणि प्रकाशकानेही कादंबरी म्हटले. 'काळा सूर्' या कमल देसाई यांच्या वाचकप्रिय लेखनाबाबतही असेच झले.

डॉ. स्वाती सु. कर्वे यांनी त्यांच्या 'लघुकादंबरीचे साहित्य स्वरूप' या पुस्तकाच्या चौथ्या सूची विभागात गणपतराव शिरके, सद्गुणी स्त्री, ना.ह. आपटे यांच्यापासून ते हिदायतखान यांच्यापर्यंतच्या लघुकादंबऱ्यांची नामावली दिली आहे. इ.स. १९९६ ते २०१० या कालावधीतील महत्त्वाच्या लघुकादंबऱ्या, दीर्घकथा/कथांचीही यादी दिलेली आहे. प्रतीती ही सानिया यांची दीर्घकथा आहे, तर अवकाश ही त्यांचीच लघुकादंबरी आहे, डॉ. स्वाती सु. कर्वे. यांनी वामन मल्हार जोशी, विभावरी शिरूरकर, जयवंत दळवी, दिलीप पु. चित्रे, वसंत आबाजी डहाके अशा अनेकांच्या लेखनावरही सविस्तर लिहिले आहे.

जी कथात्म कलाकृती मानवी जीवनातील व्यक्तिगत पातळीवर अधिक विकास पावते किंवा एका सूत्राच्या मदतीने समूह जीवनाचे चित्रण करते; आपल्या मर्यादित विकासात एका स्वतंत्र जीवनांशाचे, संघर्षाने भान आणून देते; कादंबरीतंत्राने विकसित होऊन मर्यादित अवकाशात संपते ती लघुकादंबरी. वा जो अनुभव व्यक्तिगत पातळीवर अधिक रेंगाळत असतो किंवा एका सूत्रात समूह जीवनाचे, व मर्यादित परिघात एका संपूर्ण जीवनाचे चित्र उभे करीत असतो, असा कादंबरीतंत्राने विकसित होणारा कथात्म लेखनप्रकार म्हणजे लघुकादंबरी, असे स्वाती कर्वे लिहितात..

मराठी कादंबरीचा इतिहास

पहिली कादंबरी : यमुनापर्यटन (इ.स.१८५७), लेखक बाबा पदमनजी. ही आधुनिक भारतीय भाषांतलीही पहिली कादंबरी समजली जाते.

पहिली लघुकादंबरी : शिरस्तेदार (इ.स. १८८१), लेखक विनायक कोंडदेव ओक

पहिली सामाजिक कादंबरी : पण लक्षांत कोण घेतो (.इ.स. १८९३), लेखक हरी नारायण आपटे

प्रसिद्ध मराठी कादंबरीकार

अरुण साधू

प्रल्हाद केशव अत्रे

आनंद यादव

गंगाधर गाडगीळ

गौरी देशपांडे

चिं. त्र्यं. खानोलकर

चिं. वि. जोशी

जयंत नारळीकर

जयवंत दळवी

द. मा. मिरासदार

दया पवार

ना.सी. फडके

भालचंद्र नेमाडे

पु.भा. भावे

बाबा कदम

रणजित देसाई

लक्ष्मण माने

लक्ष्मण लोंढे

व. पु. काळे

वि. स. खांडेकर

श्री.ना.पेंडसे

सुहास शिरवळकर

केशव मेश्राम

बाबूराव बागूल

अण्णाभाऊ साठे

सुधाकर गायकवाड

शंकरराव खरात

रा.रं. बोराडे

नरेंद्र नाईक

व्यंकटेश माडगुळकर

प्रसिद्ध कादंबऱ्या

अमृतवेल (कादंबरी)

आनंदी गोपाळ

आमदार सौभाग्यवती

ऋतुचक्र

कुणा एकाची भ्रमणगाथा

कोसला

जरिला

झाडाझडती

झोपडपट्टी

झेप

तांबडफुटी

दुनियादारी

पाचोळा

पानिपत

पार्टनर

पोखरण

फकिरा

बनगरवाडी

बिधर

महानायक

मृत्युंजय

ययाति

रणांगण

राऊ

व्यासपर्व

शूद्र्

श्रीमानयोगी

संभाजी

सूड

स्वामी

ही वाट एकटीची

काळोखातील अग्निशिखा

Wednesday 8 November 2017

कोर्टाची नोटीस

पुर्वी पोस्टमनच्या हातात नेहमी
पत्रे दिसायची नाते जोडणारी
आता दिसते कोर्टाची नोटीस
ती असते नात्यास दुभंगणारी

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ नोव्हेंबर २०१७