किणारा
अन् लाट
अजब मैत्री आहे
किणारा
अन् लाटेची,
काय जादू आहे
निसर्गाच्या
या किमयेची?
स्पर्शून
हळूच जाते
लाट हि किणार्याला,
विलीन
होत सागरात
खुणावित
जाते वार्याला!
काय उपमा द्यावी
दोघांच्या
या नात्याला?
यात कसे विसरता
येईल
नटखट वेड्या वार्याला?
यल्लप्पा
सटवाजी कोकणे
१८ एप्रिल २०१५
No comments:
Post a Comment