श्री. जितेश मिंडे (डाॅ. योगेश मिंडे - बदलापूर यांचे मोठे बंधू) हे "गुरूकुल समाज विकास प्रबोधिनी" (रायगड) संस्थेचे (NGO) संस्थापक आहे. राहणार बदलापूर. त्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या संस्थेसाठी घोष वाक्य व कविता लिहण्याचा मान मला मिळाला. श्री. जितेश मिंडे यांनी मला हे कार्य सांगितल्याबद्दल मी त्यांचा खुप आभारी आहे.
"गुरूकुल समाज विकास प्रबोधिनी"
घोष वाक्य
ध्यास आहे तुमचा, सहवास नक्कीच गुरूकुलचा
जिथे चिकाटी तुमची, असेल मदत गुरूकुलची
कविता
पुढील आयुष्यात तुमच्या
सहवास नेहमी गुरूकुलचा।।
जिद्द असता तुमची
मदतीचा हात गुरूकुलचा ।।१।।
एकच मनी ध्येय
व्हावा विकास समाजाचा।।
लपला गुरूकुलच्या प्रयत्नात
विजय प्रत्येक गोरगरीबाचा।।२।।
असेल तुमचे सहकार्य
लावू पळवून दुःखाला।।
हरवल्या जिद्दीची जादू
दाखवून देऊ जगाला।३।।
होता मन परिवर्तन तुमचे
सुख नांदेल जीवनी।।
संस्था आपली एकच
गुरूकुल समाज विकास प्रबोधिनी।।४।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ फेब्रुवारी २०१६
No comments:
Post a Comment