होताच भास तुझा, छेडतो नवे तराने।।
ये भेटून जा आता, वाढत आहे झुरणे।।धृ।।
रमतेस स्वप्नात येऊन, जातेस वेड लाऊन।।
धावते सैरभैर मन, भास तुझाच होऊन।।
मिठी अधीर झाली, सोड सारे बहाणे।।
ये भेटून जा आता, वाढत आहे झुरणे।।1।।
का आहेस अजान तु, ओळखून घे मन तु।।
दे परतून प्रिये, चोरून घेतले प्राण तु।।
रोमा रोमात आहेस, तुच माझी साजणे।।
ये भेटून जा आता, वाढत आहे झुरणे।।2।।
भिरभिरती तुझ्या नजरा, जीव होतो बावरा।।
भुलवून मज जातो, तुझ्या केसातील गजरा ।।
गातो तुझ्याच साठी, प्रेमाचे आज गाणे।।
ये भेटून जा आता, वाढत आहे झुरणे।।3।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
01 नोव्हेंबर 2015
No comments:
Post a Comment