Sunday, 4 December 2016

गणेश उत्सव

"गणेश उत्सव"

साजरा करण्यास सोहळा बाप्पाचा
उत्सुक असतात सर्व भक्तजन,
जय्यत तयारी सुरू करण्यास
जातपात विसरून जमती सारेजण ।।१।।

पहिल्या दिवसापासून पूजाअर्चा
असतो मंत्रमुग्ध प्रत्येक दिवस,
मोदक पेठे प्रसादा सोबत
आरत्या भजनात सजतो दिवस ।।२।।

एकिकडे मंडपात गणेशाची मुर्ती
मंडपाच्या मागे चाले जुगार,
समोर असतो भक्तीचा देखावा
मागे विकृतीचा चाले बाजार ।।३।।

आला शेवट निरोपाचा दिवस
विसर्जनासाठी भक्तांची लगबग वाढली,
ठोल ताशे लेझीमच्या खेळात
घरगुती-सार्वजनिक मिरवणूक निघाली ।।४।।

विसर्जन झाले गणपती बाप्पाचे
भक्तजन सारे घरी परतले,
पाहून उदास देव्हारा अन् मंडप
भक्त बाप्पाचे गहिवरून आले ।।५।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ सप्टेंबर २०१५

No comments:

Post a Comment