संभाळ तु गं पोरी, उडतो पदर वार्यानं ।।
खोडकर इशारे करून, वेड लावलं पोरीनं।।धृ।।
चंद्राची आहेस कोर, जीवाला लावते घोर।।
पाहून तुला पोरी, नाचे मनी मोर।।
करून घायाळ मना, झुराया लावते जीवा।।
झोप उडाली माझी, तुझ्या दुडक्या चालीनं।।
संभाळ तु गं पोरी, उडतो पदर वार्यानं ।।
खोडकर इशारे करून, वेड लावलं पोरीनं।।१।।
आहे माझा सुर तु, नको राहूस दूर दूर।।
भेटून जा तु प्रिये, लागली जीवा हुरहुर।।
करी हृदयावर घाव, सांग तुझा डाव।।
पहाते हळूच वळून, पदर चाचपून हातानं।।
संभाळ तु गं पोरी, उडतो पदर वार्यानं ।।
खोडकर इशारे करून, वेड लावलं पोरीनं।।२।।
मेघ बरसे जोमात, हरवतेस टपोर्या थेंबात।।
जीव गुरफटतो माझाही, ओल्या चिंब कायात।।
भारावून गेलो क्षणात, भरलीस माझ्या मनात।।
विसरून गेलो दुनिया, मोहून टाकलं गजर्यानं।।
संभाळ तु गं पोरी, उडतो पदर वार्यानं ।।
खोडकर इशारे करून, वेड लावलं पोरीनं।।३।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ नोव्हेंबर २०१५
No comments:
Post a Comment