प्रेम म्हणजे नेमके काय आहे
जाणीव याची आता होत आहे,
दूर जरी गेलीस सोडून मजला
भास जवळ असण्याचा होत आहे ।।१।।
सहजच कविता सुचतात मला आता
प्रेमाच्या गावी दूर दूर हिंडताना,
रात्र अशीच नकळत निघून जाते
सहवासातले क्षण ते आठवताना ।।२।।
कसा मी व्यक्त करू सांग प्रिये
दडवून ठेवलेला भाव मी मनातला,
गेलीत उलटून कित्येक ती वर्षे
समजणार कधी अर्थ गाण्यातला ।।३।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ सप्टेंबर २०१५
No comments:
Post a Comment