बदलापूर गाव
पूर्व पश्चिम पर्वत रांगा
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले,
डोक्यावर डोंगर, पायथ्याशी नदी
असे बदलापूर गाव नटलेले ।।१।।
राम विठ्ठल शंकर हनुमान
असे मंदिर येथे असलेले,
पूर्वेकडील खंडोबाची डोंगरी अन्
कोकणच्या उत्तरेला सरकलेले ।।२।।
कुळगाव बदलापूर सिमेमधून
वाहते पात्र उल्हासनदीचे,
उत्तरवाहिनी अशी ही नदी
शान वाढवी बदलापूर गावचे ।।३।।
गाव माझे बदलापूर आहे
ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेला असलेले,
शांत आणि सुंदर ठिकाण
निसर्गाच्या सानिध्यात वसलेले ।।४।।
होते इंग्रजांच्या ताब्यात गाव हे
दोन दिवस राज्य त्यांनी गाजवलेले,
शिवाजी महाराजांनी घोडे बदलून
विश्रांतीचे स्थान होते निवडलेले।।५।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ ऑगस्ट २०१५
No comments:
Post a Comment