परिस्थितीनुसार आपल्या हातून घडलेल्या चांगल्या कामाचं आपल्यालाच कौतुक वाटतं. पण आपण घेतलेल्या निर्णयामुळे किंवा केलेल्या कामामुळे जेव्हा नुकसान होतं, तेव्हा आपण दुसऱ्याला जबाबदार ठरवून मोकळे होतो.
बाहेर समाजात कितीही मान–सन्मान मिळत असला, तरी काही वेळा घरच्या व्यक्तींसमोर आपला मीपणा आणि स्वहितवृत्ती आड येते व मने दुखावली जातात; तेव्हा त्या व्यक्तिमत्त्वाला काहीच किंमत राहत नाही.
जगात आल्यावर आपला स्वार्थ पूर्ण होत असताना आपले आयुष्य कमी कमी होत जाते. परंतु आईच्या गर्भात आपण वाढत असलो तरी तिच्याकडून आपल्याबद्दल कोणतीही अपेक्षा नसते.