यल्लप्पा सटवाजी कोकणे
Monday, 29 September 2025
नऊ महिने नऊ दिवस
जगात येण्यासाठी नऊ महिने आणि नऊ दिवस हे ठरलेले असतात; पण जगात आल्यानंतर कोणतीही वेळ निश्चित नसते. "अजूनही जगायचं आहे" असं सांगूनही श्वास ऐनवेळी निघून जातो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० सप्टेंबर २०२५
Friday, 26 September 2025
खंत
एक मोठी खंत आहे की, आयुष्य जगताना आपल्यासोबत कोणीच नसतं, पण अंत्ययात्रेला हजारो लोक उपस्थित असतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ सप्टेंबर २०२५
Wednesday, 24 September 2025
मन मोकळं
नवरा-बायकोने एकमेकांना मनातील प्रत्येक गोष्ट सांगायला हवी, कारण मनस्ताप होण्यापेक्षा मन मोकळं झालेलं बरं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ सप्टेंबर २०२५
Tuesday, 23 September 2025
विश्वास संपादन
एखाद्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्याला स्वतः प्रामाणिकपणे वागावं लागतं, कारण खोटं फार काळ टिकत नाही.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ सप्टेंबर २०२५
Tuesday, 16 September 2025
मरणयातना
आई एकदाच जन्म देते, पण आयुष्यभर मरणयातना देण्यासाठी जग सज्ज असतं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ सप्टेंबर २०२५
Saturday, 13 September 2025
प्रेम आणि आदर
प्रेमाने आणि आदराने कमावलेली माणसं जवळ असतील, तर श्रीमंत असल्यासारखं वाटतं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ सप्टेंबर २०२५
Wednesday, 10 September 2025
आपल्या हिमतीवर
आपण आपल्या विचारांनी आणि आपल्या हिमतीवर प्रत्येक गोष्ट कमावतो, म्हणून कोणाच्याही दबावाखाली राहण्याचं काहीच कारण नाही.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० सप्टेंबर २०२५
Newer Posts
Older Posts
Home
View mobile version
Subscribe to:
Posts (Atom)