Tuesday, 31 December 2024

भ्रम

सत्यता पडताळून पाहण्याचं धाडस करू नये. आपण जितकं भ्रमात राहू तितकंच आपण आनंदी राहत असतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०१ जानेवारी २०२५

समजदार व्यक्ती

समजदार व्यक्ती कधीच कोणावर नाराज होत नाहीत ते स्वतःचीच समजूत काढतात आणि शांत राहतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३१ डिसेंबर २०२४

Sunday, 29 December 2024

जीवाची घुसमट

जीवाची घुसमट होत असताना मन शांतीचा मार्ग सापडत नसेल तर आपल्या मनाच्या विरुद्ध कधीही जाऊ नये कारण आपले मन जे सांगतो तेच आपल्या भल्यासाठी असतं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३० डिसेंबर २०२४

स्वतःची सावली

जेव्हा आपला स्वतःवर विश्वास नसतो तेव्हा आपण आपल्याच सावलीलाही घाबरत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२९ डिसेंबर २०२४

Friday, 27 December 2024

चेहऱ्या मागचे चेहरे

चेहऱ्या मागचे चेहरे ओळखता आले की आपली फसवणूक होत नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२८ डिसेंबर २०२४

विज्ञान

विज्ञानाने एक नियम सांगितला आहे कि ताणलं कि तुटतं. म्हणून आपण जास्त ताणत नाही. पण नात्यात सर्व नियम मोडीत काढले जातात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२७ डिसेंबर २०२४

Wednesday, 25 December 2024

जवाबदारी

जबाबदारी वाढली की मनासारखं जगणं राहून जातं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२५ डिसेंबर २०२४