Saturday, 30 November 2024

ज्ञानात भर

"मला हे माहीत आहे" असं एखादयाचं म्हणणं थांबवून बोलण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचं पूर्ण ऐकून घ्यावं. कदाचित त्याच्या बोलण्याने आपल्या ज्ञानात भर ही पडू शकते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ डिसेंबर २०२४

विशाल मन

समुद्राएवढे विशाल मन असणाऱ्या कडे जर आपली तहान भागत नसेल तर ते विशाल मन काय कामाचं. या जगात बिनशर्त मदत करणारे फार कमी आहेत.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० नोव्हेंबर २०२४

Thursday, 28 November 2024

यशस्वी होणारी माणसं

यशस्वी होणारी माणसं स्वतः केलेलं नियोजन कोणालाही सांगत नाही. वेळ आली की फक्त आपलं कर्तव्य बजावत असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ नोव्हेंबर २०२४

Tuesday, 26 November 2024

भूतकाळातल्या गोष्टी

भूतकाळातल्या गोष्टीचा जो विचार ही करत नाही तो आनंदाने भरभरून जगत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ नोव्हेंबर २०२४

Sunday, 24 November 2024

ओठांवरती कर्ज

ओठांवरती कर्ज असल्यासारखं वागू नये. बिनधास्त संवाद साधला की जगणं मोकळं होतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ नोव्हेंबर २०२४

मोठं यश

आपण जितकं जास्त संयमी राहू तितकं मोठं यश संपादन करू शकतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ नोव्हेंबर २०२४

Saturday, 23 November 2024

दुसऱ्यांचे टोमणे

जगण्याचा आनंद लुटायचा असेल तर दुसऱ्यांच्या टोमण्यांकडे लक्ष द्यायचं नसतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ नोव्हेंबर २०२४