Wednesday, 31 January 2024

निर्मळ स्वभाव

पैसे तर कोणत्याही मार्गाने व हिमतीने सारेच कमवतात पण माणूस कमवायला फक्त निर्मळ स्वभाव लागतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
 ३१ जानेवारी २०२४

Wednesday, 24 January 2024

दृष्टिकोन

माणसाचा दुसऱ्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरून त्याचा स्वभाव लक्षात येतो. झाडाखाली रस्त्यावर पडलेल्या फुलांना कोणी पायदळीत तुडवतो तर कोणी उचलून घेऊन त्याचा सुगंध घेतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ जानेवारी २०२४

Monday, 15 January 2024

जीभेवर रेंगाळलेला

कानात जर कोणी विष भरले असेल तर नेहमी जीभेवर रेंगाळलेला माणूस दाताखाली येतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ जानेवारी २०२४

Thursday, 11 January 2024

नवा स्पर्श

नवा स्पर्श

नवा स्पर्श जाणवला सखीचा
नजरही तिची बोलकीच होती
प्रेम व्यक्त करण्याची वाट जणू
खऱ्या अर्थाने मोकळीच होती

जीवाला "निवांत" भेटला कधी
आठवणींच्या गावात रमून जातो
माझी नजर शोधते नेहमी तिला
तिच्याच विचारात हरवून जातो

श्वास घेणं गरजेचं असतं तसे
विचारात सखीच्या जगतो आहे
काळजाचं दुःख स्वतःस ठाऊक
तिचा दुरावा फार सलतो आहे


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
११ जानेवारी २०२४

Wednesday, 27 December 2023

समाधान

एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ती गोष्ट तिथेच सोडून द्यावी. कालांतराने त्याचे समाधान प्राप्त होतं. कारण त्रास देणाऱ्या गोष्टीचे पर्याय सापडलेले असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ डिसेंबर २०२३

Sunday, 24 December 2023

माणूसपण

माणूस म्हणून सर्वच जन्माला येतात पण माणसातले माणूसपण जिवंत ठेवून जो जगण्याचा प्रयत्न करतो तो कधी दुःखी होत नाही.

Thursday, 21 December 2023

चेहऱ्यामागचे चेहरे

रोजच्या प्रवासात हजारो चेहरे दिसतात. त्यांची भीती कधीच जाणवत नाही. पण रोजच्या संपर्कात असलेल्या चेहऱ्यामागचे चेहरे ओळखताना खूप त्रास होतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ डिसेंबर २०२३