Sunday, 30 April 2017

गझल

कोणास काय बोलू मी शांत आज आहे
घे ओळखून आता रक्तात लाट आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ एप्रिल २०१७

Wednesday, 26 April 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

केव्हाच काढलं मी काळीज आज हाती
हासून तू जराशी केलास वार तेव्हा

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ एप्रिल २०१७

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

माझेच एकट्याने अश्रू पुसून झाले
प्रवास जीवनाचा भारीच लांब होता

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ एप्रिल २०१७

गझल

वृत्त  - आनंदकंद
 गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

तो एकटाच होता अश्रूच मित्र माझा
अंतीम दर्शनाला भारीच रांग होती

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ एप्रिल २०१७

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

गझल

माझेच त्रास सारे कोणास ठाव होते?
सोसायचे मला ते माझेच घाव होते

साराच ओळखीचा भासे मला नजारा
स्वप्नात पाहिले मी ते हेच गाव होते

होता मलाच त्याचा अंदाज नेमका तो
सारेच आखलेले खोटेच डाव होते

लांबून पाहिलेला तो चेहरा कुणाचा
डोळ्यात दाटलेले सारेच भाव होते

या जीवनात आहे कोडे बरेच आता
वाटे मला अजूनी सारेच वाव होते!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ मे २०१७

Monday, 24 April 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

तो गंध नेहमीचा श्वासात फक्त होता
तो भाव ओळखीचा डोळ्यात फक्त होता

लोकांत वागताना आनंद देत गेलो
साराच काळ माझा दुःखात फक्त होता

शब्दातले बहाणे मी ओळखून आहे
तेव्हाच भाव माझा गीतात फक्त होता

जेव्हा निवांत होतो नात्यात राहताना
तेव्हाच जीव माझा ध्यासात फक्त होता

रात्रीत चांदण्याच्या हातात हात होता
साराच तो नजारा भासात फक्त होता

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ मे २०१७

Sunday, 23 April 2017

गझल

आनंदकंद

राहून पाहिले मी माझ्याच वायद्याने
वाईट या जगाला सोसून फार झाले

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ एप्रिल २०१७