Friday 30 March 2018

राम झालो मी कधी घनश्याम झालो मी

राम झालो मी कधी घनश्याम झालो मी
जन्म कुठलाही मिळो, बदनाम झालो मी !

सांग तारुण्या तुला हे काय झाले रे ?
भेटले कोणीतरी बेफाम झालो मी

काम करतानासुध्दा मी गात मी होतोना
नेहमी दुःखा, तुझा आराम झालो मी

फेकशी माझ्याकडे उद्ध्वस्त स्वप्नांना
का तुझ्यासाठी जगा गोदाम झालो मी ?

आठवायाला तुला मी विसरलो कोठ?
एवढा अजुनी कुठे उद्दाम झालो मी?

टाकले बदलून येथे तू मला जेव्हा
जग कुणी बदलेल यावर ठाम झालो मी

राहिलो साधा इथे मी, पाळली वचने
अन् जगायाचा नवा आयाम झालो मी

मी कशासाठी निघावे तीर्थयात्रेला?
गझल लिहितानाच चारीधाम झालो मी

— प्रदीप निफाडकर

Sunday 25 March 2018

राम झालो मी कधी घनश्याम झालो मी

राम झालो मी कधी घनश्याम झालो मी
जन्म कुठलाही मिळो, बदनाम झालो मी !

सांग तारुण्या तुला हे काय झाले रे ?
भेटले कोणीतरी बेफाम झालो मी

काम करतानासुध्दा मी गात मी होतोना
नेहमी दुःखा, तुझा आराम झालो मी

फेकशी माझ्याकडे उद्ध्वस्त स्वप्नांना
का तुझ्यासाठी जगा गोदाम झालो मी ?

आठवायाला तुला मी विसरलो कोठ?
एवढा अजुनी कुठे उद्दाम झालो मी?

टाकले बदलून येथे तू मला जेव्हा
जग कुणी बदलेल यावर ठाम झालो मी

राहिलो साधा इथे मी, पाळली वचने
अन् जगायाचा नवा आयाम झालो मी

मी कशासाठी निघावे तीर्थयात्रेला?
गझल लिहितानाच चारीधाम झालो मी

— प्रदीप निफाडकर

योग्य नात्याची निवड

जेव्हा एखादा साहित्यिक कोणत्याही शब्दात चूका न करता खुप विचार करून योग्य शब्दांचा वापर योग्य ठीकाणी करून, तनमन लावून आपले लेखन, काव्य पुर्ण करतो तेव्हा ते लेखन, काव्य रसिक डोक्यावर उचलून घेतात. तसेच नात्याचं असतं. आपण योग्य नात्याची निवड केल्यावर आपले जगणे सुखाचे होते.

– यल्लप्पा कोकणे
२५ मार्च २०१८

Saturday 17 March 2018

जो नको तो प्रकार मी केला

जो नको तो प्रकार मी केला
या जगाचा विचार मी केला

वेदना दे अजून थोडीशी
शब्द माझा तयार मी केला

मी स्मितानेच मारले अश्रू
हुंदका हद्दपार मी केला

पाहिले एकदाच स्वप्न तुझे
एक सौदा उधार मी केला

जीवनाशी अता पटे माझे
सोसण्याचा करार मी केला

- प्रदीप निफाडकर

Friday 16 March 2018

कविता

कविता कधीकधी वहीत
गप्प पडून शांत रहाते
कधी शब्दांचे चटके देत
आग होऊन भडकत रहाते

थोडक्यात विचार मांडून
खुप काही बोलून जाते
कधी प्रश्नावर प्रश्न मांडत
मनात गोंधळ घालून जाते

कविता म्हणजे रूजलेले
विचार मनातून फुलतात
उतरताच जेव्हा कागदावर
ओठी रसिकांच्या झुलतात

कविता जन्मास येते
पाठलाग करून भावनांचा
आणि ती खुलत जाते
स्फोट होऊन शब्दांचा

– यल्लप्पा कोकणे
१४ मार्च २०१८

Monday 12 March 2018

ये जरा आणखी जवळ माझ्या फुला

ये जरा आणखी जवळ माझ्या फुला
ओठ देतील हे गझल माझी तुला

भेट होता तुझी कैफ चढतो मला
रोज वार्यावरी बांधतो मी झुला

आपल्यासारखे ना जगी जोडपे
तू जणू बाहुली ! मी जणू बाहुला !

वेगळा हा दिसे, अन् लकाकत उठे
प्रेमरंगामध्ये रंग हा आपुला

मी तुझा ! मी तुझा ! मी तुझा ! मी तुझा !
रोज जपतो असा मंत्र हा सानुला

कैकदा वाटले छान लिहिशील तू
कृष्ण झालास रे शारदेच्या मुला

— प्रदीप निफाडकर

Saturday 3 March 2018

शिमगा

चारोळी

उधळून रंग सारे
रंगात मिसळून जाऊ
शिमग्यात वाद सारे
क्षणात विसरून जाऊ

– यल्लप्पा कोकणे

Thursday 1 March 2018

पाऊस पडतो रिमझिम

पाऊस पडतो रिमझिम, सखे भिजलं तुझं अंग।।
खट्याळ वारा तुझ्यासंगे, खेळे आज होऊनी दंग।।धृ।।

साद घालतो वारा, शीळ घालून गातो
आहे लबाड वारा स्पर्शून तुजला जातो
छान पसरली नक्षी आकाशी, इंद्रधनु फेकतो रंग।।
खट्याळ वारा तुझ्यासंगे, खेळे आज होऊनी दंग।।१।।

केस ओले गालावरी, पसरली ओठावर लाली
तारूण्य करी घायाळ, ही काय जादू झाली
वेड्या जीवास राणी किती वेड लावशील सांग ।।
खट्याळ वारा तुझ्यासंगे, खेळे आज होऊनी दंग।।२।।

पाऊस पडतो ओलाचिंब, सखे भिजलं तुझं अंग।।
खट्याळ वारा तुझ्यासंगे, खेळे आज होऊनी दंग।।धृ।।

– यल्लप्पा कोकणे
०१ मार्च २०१८

धुळवड-रंगपंचमी

दिसती धुळवडीत एकसारखे
विसरूनी वाद होतील धुंद
आहेत हो ही माणसेच सारी
रंग दाखवण्याचा राखतील छंद

– यल्लप्पा कोकणे
०१ मार्च २०१८