Friday, 16 March 2018

कविता

कविता कधीकधी वहीत
गप्प पडून शांत रहाते
कधी शब्दांचे चटके देत
आग होऊन भडकत रहाते

थोडक्यात विचार मांडून
खुप काही बोलून जाते
कधी प्रश्नावर प्रश्न मांडत
मनात गोंधळ घालून जाते

कविता म्हणजे रूजलेले
विचार मनातून फुलतात
उतरताच जेव्हा कागदावर
ओठी रसिकांच्या झुलतात

कविता जन्मास येते
पाठलाग करून भावनांचा
आणि ती खुलत जाते
स्फोट होऊन शब्दांचा

– यल्लप्पा कोकणे
१४ मार्च २०१८

No comments:

Post a Comment