Monday 30 October 2023

मानसिक त्रास

आपसात चर्चा करून चिंता वाढविण्यापेक्षा एकांतात विचार केल्यास मानसिक त्रास होत नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३० ऑक्टोबर २०२३

Saturday 28 October 2023

सावली

वागायचं असेल तर स्वतःच्या सावली प्रमाणे वागावं. परिस्थिती पाहून आपली सावली कधी लहान तर कधी मोठी होते. आणि नेहमीच आपल्या सोबत असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२८ ऑक्टोबर २०२३

Monday 23 October 2023

भावनांची कदर

भावनांची कदर असलेली व्यक्ती दुसऱ्यांना कधीही दुःख देत नाही.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ ऑक्टोबर २०२३

Wednesday 18 October 2023

जगणे कोणासाठी

स्वतःसाठी वेळ देता येत नसेल तर समजायचं की आपण आपल्या माणसांसाठी जगतो आहोत.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१८ ऑक्टोबर २०२३

Tuesday 10 October 2023

जाणीव - खऱ्या खोट्या माणसांची

माणसं जेव्हा कळायला लागतात तेव्हा आपला खूप फायदा होतो. कारण खऱ्या आणि खोट्या माणसांची आपल्याला जाणीव झालेली असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० ऑक्टोबर २०२३

टपाल पेटी post box

Sunday 1 October 2023

रक्ताचे नाते

जन्मापासून मिळालेल्या रक्ताच्या नात्यापेक्षा आयुष्यभर कमावलेली मायेची नाती नेहमीच सुख दुःखाला प्रथम हजर असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२५ सप्टेंबर २०२३