Sunday 29 March 2020

साथीचा रोग

डोळ्यांना दिसणाऱ्या शत्रूशी बळाचा वापर करून, शक्कल लढवून विजय मिळवू शकतो पण जेव्हा न दिसणारा शत्रू (साथीचा रोग) बळावतो तेव्हा आपली मनस्थिती बळकट करायची असते. घर आणि समाजाचं सहकार्यही तेवढंच अपेक्षित असतं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२९ मार्च २०२०

आठवणीची मिठी

आठवणीची मिठी 


आठवणी तुझ्या रोज
मिठी मारून जातात
तू जवळ असण्याचे
भास होऊन जातात

सवय झाली आहे
वळणावर थांबायची
नजरेत कैद करून
तुला हृदयी जपायची

डोळ्यातले भाव तुझ्या
समजतात सारे मलाही
वेडा जीव तुझ्यासाठी 
कधी कळणार तुलाही?


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२८ मार्च २०२०

Wednesday 25 March 2020

माणसातला माणूस

मंदिरातल्या देवापेक्षा माणसातला माणूसच संकट समयी मदत करण्यास धावून येतो.



यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२५ मार्च २०२०

Monday 9 March 2020

स्वभावातील रंग

धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळताना सारे भेदभाव विसरून माणूस आनंदी असतो आणि इतरांनाही आनंद वाटतो. तोच माणूस इतर दिवशी आपले स्वभावातील रंग दाखवून इतरांना दुःखी करण्याचं काम करत असतो.



यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१० मार्च २०२०