Monday 31 January 2022

लाकडासारखं वागावं

माणसांनी लाकडासारखं वागावं. जिवंत असताना अन्न शिजवून जगवतो व मन "तृप्त" करतो आणि मरणानंतर चिता होऊन आत्मा "मुक्तही" करतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०१ फेब्रुवारी २०२२

Sunday 30 January 2022

विश्वास आणि सामंजस्यपणा

जेथे विश्वास आणि सामंजस्यपणा एकत्र नांदत असतो तेथे शेवटपर्यंत प्रत्येक नातं टिकून राहत असतं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३१ जानेवारी २०२२

Saturday 29 January 2022

आभार

आपल्याबद्दल आपल्या मागून चांगले वाईट बोलणार्‍या लोकांचे आपण आभारच मानायला हवे कारण आपल्या नकळत ते आपल्याला प्रसिद्ध करीत असतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३० जानेवारी २०२२

सुर्य

सुर्य 

सुर्य निघतो मावळतीला
दाखवून दिवसाचा प्रवास
त्याच्यामुळेच घडून येतो
सुखाचा दुःखाचा सहवास

नवीन उमेद घेऊन रोजच
येतो आपल्यासाठी खास
किरणेही सोबत असतात
जोडीला जगण्याचा ध्यास

सुर्य येतो अन् निघून जातो
असतो त्याचा वेगळा थाट
पण ध्येयाचे वेडे असणारे
रोजच पाहतात त्याची वाट


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२९ जानेवारी २०२२

Friday 28 January 2022

भान आणि ताल

माणूस हा स्वतःच्या "भानावर" नसला की दुसर्‍याच्या "तालावर" नाचायला तयार होतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२९ जानेवारी २०२२

Thursday 27 January 2022

वेदना

मनात वाईट विचारांचं वारं शिरल्यावर वेदनेला उधाण येतं.


 यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२८ जानेवारी २०२२

Wednesday 26 January 2022

आपलं वागणं

आपण इतरांशी कसे वागतो हा विचार करूनच आपलं वागणं ठरलं पाहिजे. नाहीतर आपला अपमान व अपेक्षाभंग होण्याची दाट शक्यता असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२७ जानेवारी २०२२

Tuesday 25 January 2022

जीवाची तडफड

विचारांच्या जाळ्यात मेंदू अडकून राहील्यास जीवाची तडफड होते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२६ जानेवारी २०२२

Monday 24 January 2022

मनस्थिती आणि परिस्थिती

ओळखीचा रस्ता प्रकाशात सहज पार होतो तोच रस्ता अंधारात पार करताना मनात भिती निर्माण होते कारण आपली "मनस्थिती" आणि "परिस्थिती" जगण्यावर परिणाम करीत असतात. 


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२५ जानेवारी २०२२

Sunday 23 January 2022

वेदना

वेदना असह्य झाल्या की आपली व्यक्ती जवळ असावी असं नेहमीच वाटतं मग त्या वेदना शारीरिक असो वा वैचारिक.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२४ जानेवारी २०२२

Saturday 22 January 2022

योग्य निर्णय

परिस्थिती पाहून घेतलेले "योग्य" निर्णय कधीही चूकत नाही उलट आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपला व इतरांचाही फायदा होतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२३ जानेवारी २०२२

Friday 21 January 2022

बायको

बायको

सुर्याचं दर्शन घडण्याअगोदर
स्वयंपाक घराचं दर्शन लाभते
दिवसाची सुरूवात होते तेव्हा
बायको ही घरच्यांसाठी राबते

तब्येत बरी नसताना देखील 
तक्रार कोणाकडेही होत नाही
दुसर्‍यांसाठी राबत असताना 
विसावा स्वतःसाठी घेत नाही

सारा थकवा विसरून जगणारी
बायकोची झटणारी काया आहे
राग, रूसवा स्वाभाविक आहे
त्याच्यामागे दडली माया आहे

कुटूंब सांभाळत असताना ती
कधीही कमी कुठे पडत नाही
बायकोच अशी एक आहे जी
संकटास कधी जुमानत नाही

सर्व नाती सांभाळण्याची तिला
जादुई कलाच सापडलेली आहे
दुःखात सुख शोधून काढण्याची
तिच्यात हिंमतच दडलेली आहे


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२२ जानेवारी २०२२

सुकलेलं पान

झाड कधीही सुकलेलं पान आपल्या फांदीवर टिकून ठेवत नाही. त्याचप्रमाणे समाजात उपयोगी न येणाऱ्या व्यक्तीकडे समाज सहज दुर्लक्ष करतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२२ जानेवारी २०२२

Thursday 20 January 2022

संवेदना

संवेदना मेलेल्या जिवंत माणसांच्या गर्दीत संकटकाळी कोणतीही मदत न मिळणे हे मोठं दुर्दैव आहे. 


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२१ जानेवारी २०२२

Tuesday 18 January 2022

भाकरी

एक सत्य आहे की, गरीबांना भाकरी मिळविण्यासाठी शरीर थकले तरी "धावपळ" करावी लागते आणि श्रीमंतांना भाकरी पचविण्यासाठी शरीराची फक्त "हालचाल" करावी लागते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१८ जानेवारी २०२२

Monday 17 January 2022

सासू-सून मायलेकी

आपली मुलगी दुसर्‍याच्या घरात सून म्हणून राहत आहे याचं भान असणाऱ्या सासूचं आपल्या सूनेशी नातं हे मायलेकी सारखं टिकून राहण्यास मदत होते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१८ जानेवारी २०२२

Sunday 16 January 2022

पायदळी

जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या उपयोगाची असते तोपर्यंत आपण तिला डोक्यावर घेऊन मिरवत असतो. एक क्षण असा येतो की त्याच गोष्टीचा उपयोग आपल्याला होणार नाही असे लक्षात आल्यावर तिला कळत नकळत पायदळी तुडवले जाते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१६ जानेवारी २०२२

Saturday 15 January 2022

मेहनतीचं समाधान

मेहनत करून मिळवलेल्या कोणत्याही गोष्टीचं मोठं समाधान असतं आणि आयतं मिळालेल्या गोष्टी मिळून सुद्धा मनात खूप प्रश्न निर्माण होऊन मन विचलित होतं.



यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१६ जानेवारी २०२२

Monday 10 January 2022

नकारात्मक विचार

आजाराला बळ देण्याचे मुख्य श्रेय हे आपल्या मेंदूत सुरू असलेल्या नकारात्मक विचारांना जातं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१० जानेवारी २०२२

प्रेम नक्की काय असतं

प्रेम नक्की काय असतं?


रोजच भेटत असते "ती"
आजची भेट खास आहे
स्वप्नाप्रमाणेच घडले सारे
सत्य की सारे भास आहे!

ती असता समोर तेव्हाच 
मनाचा बांध फूटून जातो
काळजात साठवून सारंच
प्रेमात तिच्या वाहून जातो

रोजच्या सहवासातील जादू
घट्ट बांधून जाते नाजूक नाते
अबोला असला दोघात जरी
डोळ्यांची भाषा सांगून जाते

हे प्रेम नक्की काय असतं?
तुलाच पाहून समजले सारे
दोघांच्या भेटीत हरवलो मी
तुझ्या नजरेत जादूई इशारे


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१० जानेवारी २०२२

Saturday 8 January 2022

ज्ञान प्राप्त करण्यासाठी

ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तक तर आहेतच पण त्याच बरोबर कान डोळे उघडे ठेवून जगात घडणाऱ्या गोष्टीलाही बारकाईनं पाहणं तेवढंच महत्वाचं आहे.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०९ जानेवारी २०२२

Friday 7 January 2022

आपल्याच जास्त कळतं

आपल्याच जास्त कळतं हा विचार मनातून कमी झाला की इतरांकडून आपल्याला खूप ज्ञान प्राप्त करून घेता येतं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०८ जानेवारी २०२२

Thursday 6 January 2022

निर्णय

"निर्णय" वेळेवर घेतल्यास आनंद आणि फायदा होतो आणि वेळे निघून गेल्यावर तोटा व मनस्ताप होतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०६ जानेवारी २०२२

नवीन वर्षाचं स्वागत

नवीन वर्षाचं स्वागत करत असताना जो उत्साह, जल्लोष असतो तोच जर प्रत्येक दिवशी कायम राहत असेल तर दुःख आपल्याला स्पर्श करण्याची हिंमतच करणार नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०६ जानेवारी २०२२

Sunday 2 January 2022

बाप माणूस

बाप माणूस 

मुलाच्या सुखासाठी धावताना
बाप माणूस कधी थांबत नाही
एकच अशी व्यक्ती आहे जी
स्वतःसाठी काही मागत नाही

तहान भूक आराम विसरून
गिळून दुःख जगत असतो
मुलांचे भविष्य घडवताना
बाप नेहमीच राबत असतो

कितीही अडथळे आले तरी 
स्वतःसाठी जगणं जमलं नाही
झिजतात चपला मुलांसाठीच
क्षणभरही थांबणं जमलं नाही

सलाम आहे बाप माणसाला 
हृदयी डोंगराएवढी माया आहे
जगाची चिंता जराही न करता
झिजणारी बापाची काया आहे


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०२ जानेवारी २०२२

Saturday 1 January 2022

जीवनाचा क्रम

वर्ष, महिने, दिवस व वेळ हे त्यांचा क्रम सुरूच ठेवतील पण आपण भूतकाळात न रमता वर्तमानात जगताना भविष्याचा विचार करत वाटचाल सुरू ठेवली की जीवनाचा क्रम सुखकारक होतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०१ जानेवारी २०२२

नवीन वर्ष

नवीन वर्ष 

महिना सण-वार तोच असतो
वर्ष नवीन रूप बदलत असतो
माणूस हा मानसिकता बदलून 
आपल्या परीने जगत असतो

आज सारखा उद्याचा दिवस 
सुर्य तोच, तोच वारा असतो
माणसं फक्त बदलतात नेहमी
आपण आपला सहारा असतो

सारे काही तेच ते असले तरी 
सारे सुखात राहो हीच इच्छा
मनापासून तुम्हा सर्वांना देतो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०१ जानेवारी २०२२