Saturday 27 November 2021

जिद्द

जिद्द असली की आपण जगाला विसरून आपले काम करीत असतो पण सार्‍या जगाच्या नजरा आपल्याकडेच असतात हेही तितकेच सत्य आहे.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ नोव्हेंबर २०२१

संस्कार

सारे मानव हे जन्मल्यावर समान असतात पण पुढे आयुष्य जगताना मिळालेले संस्कार, स्वतः करत असलेला विचार आणि समोर असलेली परिस्थिती या तीन गोष्टींमुळेच प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या होत असतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ नोव्हेंबर २०२१

Sunday 21 November 2021

दुःखाची जाणीव

दुसर्‍यांच्या दुःखाची जाणीव असणाऱ्या व्यक्ती कोणत्याही परिस्थिती स्वतः आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांना हे कळून चुकलेलं असतं की या जगात स्वतः पेक्षा जास्त दुःखी असणारे व्यक्तीही आपल्याच सभोवती असतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२१ नोव्हेंबर २०२१

Wednesday 10 November 2021

विचारांचा आयुष्यावर परिणाम

मनातील विचार आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करीत असतात. त्यासाठी वाईट विचार मनात न आणता चांगला विचार करण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे स्वतःला व आपल्या माणसाला त्रास होत नाही.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१० नोव्हेंबर २०२१

Sunday 7 November 2021

वेळ

वेळ निसटून जाते हातातून 
थांबवून ठेवणे जमत नाही
वेगवान धावणाऱ्या क्षणाला
सजवून ठेवणे जमत नाही


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ नोव्हेंबर २०२१

Saturday 6 November 2021

चांगले विचार

आपल्याला त्रास होईल असे विचार करणे थांबवून चांगले विचार केल्यास शरीरात एक सकारात्मक ऊर्जा वाहू लागते. त्यामुळे भविष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०७ नोव्हेंबर २०२१

माणूसकी व आपूलकी

आईच्या गर्भापासून ते अंत्ययात्रेपर्यंतचा प्रवास सुखकारक होण्यासाठी माणूसकी व आपूलकी लाभणे गरजेचे आहे. याची सुरुवात आपल्यापासून दुसर्‍यांसाठी होणे फार महत्त्वाचे आहे.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०७ नोव्हेंबर २०२१