Tuesday 27 June 2017

गझल

काळोख सत्य सारे सांगून पहाट गेली
त्या चांदण्यात आता न्हाऊन पहाट गेली

आहे अबोल का तू भीती मनास वाटे
शृंगार आज सारा सांगून पहाट गेली

नाही समोर आता ती दूर फार गेली
अस्तित्व आज सारे भासून पहाट गेली

सांडून रक्त त्यांचे तो देश लाल झाला
स्वातंत्र्य एकदाचे देऊन पहाट गेली

पाऊस

नाही तशी गरज फारशी
तेथेच फार बरसत आहे
पावसा, हो आता ऊदार तू
माझा शेतकरी तरसत आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ जून २०१७

Tuesday 20 June 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद
गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

शेतात राबणारे जीवा उदार होते
ते मेघ वाहणारे ईमानदार होते

सर्वस्व अर्पिले मी सारे तिलाच माझे
का आजही सखीच्या ओठी नकार होते?

मी चोरपावलांनी भेटावयास आलो
तैनात चांदणेही रात्रीस फार होते

चिंता कधीच नाही केली कशाची मी
देण्यास हात हाती ते जाणकार होते

देहात प्राण होता कोणी नसे समोरी
निष्प्राण देह जेव्हा खांदे तयार होते

रे मेघा

रे मेघा, करतो विनवणी
सोड आता पावसाला
धरणी माय पहाते वाट
त्याला थांबवलंस कशाला?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० जून २०१७

Wednesday 14 June 2017

पाऊस

पाऊस

मन वेडे गुंतले पागोळ्यांत
सुरू झाल्या पाऊस धारा
निरोप घेत उकाड्याचा कसा
वाहतो आहे खुशीत वारा

उल्हास दाटला चोहिकडे
लागले सजू डोंगर रान
नदी वाहते जोमात आता
सारे विसरती जगण्याचं भान

पहात होती धरती वाट
कसा येऊन गेला बिलगून
पाऊस होता उनाड-लबाड
धरतीला पहा गेला सजवून

तपश्चर्या मोठी संपली आज
धरेने घेतले पावसाला बाहूत
नटून थटून सजली धरणी
ऊठून दिसते हिरव्या शालूत

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ जून २०१७

Sunday 4 June 2017

काही मनातलं

    मी नुकताच गझलेकडे वळलो आहे आणि याच कालावधीत मला जेष्ठ गझलाकार श्री. प्रदीप निफाडकर सर यांचा "गझलगप्पा" याचे चारही भाग मला यूट्यूब वर पहायला मिळाले. या चारही भागात गझलेविषयी फार छान माहीती आहे. माझ्यासारख्या नवीन गझल शिकणार्‍याला या चारही भागाची गझल समजून घेण्यास फार मदत होते. आज (०४ जून २०१७) माझ्यासाठी खुप आनंदाचा दिवस आहे. "गझलगप्पा" याचे चारही भाग पाहील्यावर मला श्री. प्रदीप निफाडकर सरांशी बोलण्याची इच्छा झाली. माझे सरांशी आज  (०४ जून २०१७) पहील्यांदा फोनवर बोलणं झालं. त्यांनी मला फोनवरून मोलाचे मार्गदर्शन केलं. माझ्या काही शंका होत्या त्याचही त्यांनी निरसन केलं. श्री. प्रदीप निफाडकर सरांशी बोलणं झालं म्हणून मी आज खुप खुश आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ जून २०१७

सुरेश श्रीधर भट : गझलसम्राट

सुरेश श्रीधर भट
सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते.
सुरेश श्रीधर भट
जन्म नाव - सुरेश श्रीधर भट
टोपणनाव - गझलसम्राट
जन्म - एप्रिल १५, १९३२ अमरावती, महाराष्ट्र
मृत्यू - मार्च १४ ,२००३ नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व - भारतीय
कार्यक्षेत्र - काव्य, साहित्य, पत्रकारिता
भाषा - मराठी
साहित्य प्रकार - कविता,गझल़
प्रसिद्ध साहित्य - कृतीरूपगंधा, रंग माझा वेगळा,एल्गार, झंझावात, सप्तरंग
वडील - डॉ॰ श्रीधर रंगनाथ भट
आई - शांता श्रीधर भट
अपत्ये - विशाखा, हर्षवर्धन, चित्तरंजन
संकेतस्थळ - www.sureshbhat.in
त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे कर्‍हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांचा खूप नाद होता. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली.
सुरेश भट यांनी ते अडीच वर्षाचे असताना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.
सुरेश भट आणि संगीत
शालेय जीवनात त्यांना संगीताची गोडी आईने लावली होती. त्या स्वतः हार्मोनिअम वाजवत. त्यांनी मैदानी खेळ खेळण्यास जाऊ न शकणार्‍या आपल्या लाडक्या मुलाला बाजाची पेटी आणली होती. भट यांचे वडील- श्रीधरपंतही संगीतप्रेमी होते. त्यांनी एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन आणला होताच; मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एक तरी ध्वनिमुद्रिका विकत आणत. ही संगीतआवड सुरेश भट यांना शाळेच्या बँडपथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवीत. संगीतातील गती पाहून श्रीधरपंतांनी सुरेशला रीतसर संगीत शिक्षण द्यायचे ठरविले आणि प्रल्हादबुवा घरी येऊ लागले. आजारी असताना सुरेश भट तासन् तास अंथरुणावर बासरी वाजवत बसलेले असायचे. सुरेश भट स्व्तः उत्तम गायक होते. त्यांचा गायनाचा एक कार्यक्रम अमरावतीत २०-२-१९८४ रोजी झाला होता. त्यावेळी साथीसाठी पेटीवर हृदयनाथ मंगेशकर होते. अंथरुणावर बसून आणि पडून त्यांनी गुलाबराव महाराज यांचा ‘गानसोपान’ हा ग्रंथ आणि विष्णू नारायण भातखंडेकृत ‘संगीत खंड’, असे अनेक ग्रंथ सुरेश भट यांनी त्याच काळात वाचले होते. त्यांनी ‘गानसोपान’ची अनेक पारायणे केली होती.
१९५२ ला त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तोही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत.
शरीरसाधना आणि खेळ
भटांचा एक पाय कमजोर झाल्यावर त्यांनी व्यायामावर जोर देऊन बाकीचे शरीर मजबूत बनवले. याचा उपयोग त्यांना गाण्यातही झाला. ते तासन् तास मैफली करू शकत. ते दंड-बैठका काढतच पण डबलबारवर १०० ते १५० डिप्स मारत. त्यामुळे इतकी शक्ती पायात आली की ते सायकल चालवू लागले. वडिलांनी त्यांना मिलर कंपनीचा डायनोमा असलेली रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी दिली होती. १९६५ मध्ये जेव्हा अमरावती रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल झाला तेव्हा अमरावतीतील सायकल रिक्षावाले त्यावर उतरून ती चढण चढत. पण सुरेश भट आपला भाऊ दिलीप याला डबलसीट घेऊन एका दमात ती चढण चढत. ते हुतूतू, व्हॉलीबॉलही खेळत. ते आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप (शोभादर्शक), पेरिस्कोपही बनवीत. काचा कुटून पतंगाचा मांजा बनविण्यात ते वाकबगार होते. सुरेश भट यांना गुलेर (बेचकी किंवा गलोर) बनविता येई. त्यांचा नेम अचूक असे. ते पाहून श्रीधरपंतांनी त्यांच्यासाठी खास अमेरिकन स्लिंग शॉट बंदूक आणली होती. ती वापरून भट चिमणी, कबुतर घायाळ करीत. ते भालाफेकही करीत. भालाफेकीचा सराव घराजवळच्या निंबाच्या झाडावर चाले; तर तलवारबाजीचा प्रा. बाबा मोटे यांच्याबरोबर. एका घावात दोन तुकडे करण्यात सुरेश भट ‘एक्सपर्ट’ होते.
शिक्षण आणि काव्यलेखन
सुरेश भटांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यावर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.
त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.
कौटुंबिक
सुरेश भट यांना दोन मुले होती. त्यापैकी एकाचा अपघातात मृत्यू झाला होता.
हृदयविकाराच्या झटक्याने १४ मार्च २००३ रोजी त्यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले.
काव्यसंग्रह
एल्गार
काफला
झंझावात
रंग माझा वेगळा (१९७४)
रसवंतीचा मुजरा
रूपगंधा
सप्‍तरंग
सुरेश भट - निवडक कविता
हिंडणारा सूर्य (गद्य)
सुरेश भट यांच्यावरील पुस्तके
अन उदेला एक तारा वेगळा (प्रकाशन वर्ष २०११) : डॉ. राम पंडित
गझलसम्राट सुरेश भट आणि ... (प्रदीप निफाडकर)

प्रदीप गजाननराव निफाडकर : गझलाकार

http://pradeepniphadkar.tripod.com/
PRADEEP NIPHADKAR
P R A D E E P       N I P H A D K A R
Address :
Sadnika No. 29, 3rd floor, Ridhi-Sidhi Gruhsankul, Vadgaon Bk., Bhumapan No. 14, Anand Nagar, Pune- 411 051
Mobile - 9850384232
Personal Infomation -
Birth Date -  2nd July 1962
Birth Place - Pune
Education -
MA [MARATHI]
OCCUPATION -
Journalist
EXPERIENCE
- SAKAL, pune(Since - 1998)
2001- DESHDOOT
(Since- 2003 LOKMAT)Co-Editor
PUBLISHESH :
DEKHANI- A Marathi Gazal Audio published
Yashvantrao Chavan mukta Veedyapeeth's Journalism study- Article in Book
SWAPNAMENA - Marathi Kavya Sangraha Published in 2000, (in 2005 2nd Edition published)
VEGALE WATTSARU - Vyakti Chitran published (2001)
AABHAL PELNARA AAYUSHA - marathi book published
Jain Religion 24 Tirthkaravaril Gaani- Sang by Suresh Wadkar. (Book will soon publish)
GAZALDEPP - book on Marathi gazal soon publish.
AWARDS -
'Late Dadasaheb Potnis Puraskar' for Journalism
'Prabhkar Vaidya Puraskar' for Swapnmena Kavya Sangrah.
UrduMitra Puraskar.
Vaishnav Puraskar.
1st 'Late Bhahusaheb Patankar Smruti Puraskar'
Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Samajnistha Patrakarita Puraskar-2004'
FAMOUS NEWS SERIES-
Bogas Pramanpatra Prakaran.
Mukta Vidhyapeethatil Bhrastachar.
Nashik Mahapaliketil Jakat Chori Prakaran.
Programme Attendance :
'Gazal Deep' Marathi Gazal programme - various 25 places of Maharashtra till date.





Saturday 3 June 2017

लघु गुरु शंका निरसन

*लघु गुरु शंका निरसन*
    -इंदू
    *fb.me/INDUJI.in

दोन लघूंचा गुरु करणे एकंदर काव्यलेखनात वापरली जाणारी एक प्रकारची सवलत आहे. ती वापरणे हाही एक कलेचाच भाग आहे. कारण ती वापरताना ती अतिशय चपखलपणे वापरता आली पाहिजे. खास करून गजलेत तर थोडी जास्तच काळजी घ्यावी लागते. कारण गजल हा गेय काव्यप्रकार आहे. गजलेत लय, यती, आणि चाल या तिन्ही निकषावर कुठेही तडजोड चालत नाही. गजलेत यती घेण्याचे जरी स्वातंत्र्य असले तरी ती कायम ठेवणे हाही एक महत्वाचा निकष आहे. यती हा मुद्दा अलग आहे. त्यावर योग्यवेळी अलग भाष्य करूच.

एक महत्वाचा नियम म्हणजे कि आपण फक्त एका शब्दातील दोन लघूंचा गुरु करू शकतो. दोन वेग वेगळ्या शब्दातील लघूंचा गुरु करू नये. हा अगदी बेसिक नियम आहे. हा जोवर तुम्ही गजल हा काव्यप्रकार अनुभवणार आहात तोपर्यंत लक्षात ठेवा..

पण, तूर्त इतकेच सांगावेसे वाटते की, दोन लघुचा गुरु करताना तो इतका सहज झाला पाहिजे की गजलेच्या वाचनात किंवा गायनात कुठेही त्याची जाणीव होता कामा नये. यासाठी विशेष असे लिखित नियम नाहीत पण अलिखित पणे बरेच नियम व निकष आहेत. जस जसे आपण पुढे जाऊ तसतसे आपण आणखी खोलवर समजावून घेत जाऊ.

तूर्त काही उदाहरणे देत आहे.

*नियम* = लगा (गाल होत नाही)
*मरण* = लगा (गाल होत नाही)
*रुजवले, हसवले, रडवले, बसवले* = लललगा किंवा याचा लगागा होऊ शकतो पण गालगा होत नाही आणि केला तर तो इतका सहज होत नाही. त्यामुळे तसा तो करू नये.

अशी बरीच उदाहरणे आहेत.

शिवाय.
*य, व, न, र, ण, म* या अकारांत अक्षरांचा लघु पासून गुरु बनविताना विशिष्ठ प्रकारे बनवावा लागतो. एखाद्या शब्दात जर हि अक्षरे येत असतील तर प्रथम या अक्षरांच्या आधीच्या अकारांत अक्षराशी याची संधी करून गुरु साधावा कारण हि अक्षरे अशा वेळी  व्यंजनासारखा व्यवहार करतात. इकारांत उकारांत, ओकारांत वेळी ती त्रयस्थ राहतात

उदा:

*व हा आधीच्या अक्षरावर एक काना एक मात्रा याप्रमाणे येतो*
*अवयव (लललल)* = अवयौ/औयौ/औयव = हा शब्द लगागा, गागा गालल असाही होऊ शकतो
*मानव (गालल)* = मानौ = गागा होऊ शकतो

*य हा आधीच्या अक्षरावर मात्र्याप्रमाणे येवू शकतो.*
*सवय (ललल)* = सवै = लगा (गाल नाही) (इथे मध्ये व असूनही य ने प्राधान्य घेतले आहे, हे लक्षात घ्यावे)
*मनोदय (लगालल)* = मनोदै = लगागा

*न म व ण हि अक्षरे आधीच्या अक्षरावर अनुस्वाराप्रमाणे येवू शकतात*
*नियम (ललल)* = नियं = लगा (इथे तुमच्या लक्षात आले असेल कि इथे य हा त्रयस्थ होतो कारण नि इकारांत आहे. त्याचमुळे हा शब्द गाल होत नाही.)
*समजूत(ललगाल)*= सम्जूत = गागाल होतो
*सणवार (ललगाल)* = संवार = गागाल
*सदन (ललल)* = सदं = लगा (इथे गाल होऊ शकत नाही)
*संगम (गालल)* = संगं = गागा होऊ शकतो

*र हा नंतरच्या अक्षरावर रफाराचे काम करतो व त्याच्या आधीचे अक्षर गुरु करतो*
*सरदार (ललगाल)* = सर्दार = गागाल
*घरदार (ललगाल)* = घर्दार = गागाल
*सरकार  (ललगाल)* = सर्कार= गागाल

*अजून भरपूर उदाहरणे घेता येतील पण, हा सर्व व्यापा पाहता ते अतिशय अशक्य आहे. अर्थात हे सर्व अक्षरांचा उच्चार कसा होतो त्यानुसार ठरत असल्याने प्रत्येक वेगळ्या शब्दाला वेगळी लगावली लागू होते. इथे मी विषद केलेले सर्वच नियम सर्वत्र तसेच्या तसे लागू होतीलच असे नाही. याला बरेच अपवाद आहेत व ते अनुभवातून समोर येतील तसे ते उलगडत जातील. ज्या दोन लघुंची सहज संधी होऊन गुरु बनतो तेच उत्तम. सवलतही अशी घ्यावी कि ती सवलत वाटूच नये. उलट घेतलेली सवलत इतकी आकर्षक असावी की त्यामुळे संपूर्ण रचनेची शोभा वाढावी अशा वेळी ती सवलत स्वागतार्ह ठरते. म्हणूनच मी सुरवातीला सवलत घेणे सुद्धा एक कला आहे असे नमूद केले होते.*

मीही अजून गजल लेखन शिकत आहे... अजून खूप शिकणे बाकी आहे. माझ्या अल्पमतीने व गुरूंच्या आशीर्वादाने जे शिकलो तेच  आपणा सर्वांच्या उपयोगी पडावे म्हणून इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चूकभूल देणे घेणे.

धन्यवाद
-इंदू

Friday 2 June 2017

सुगंधीत पाणी

सुगंधीत पाणी

नाही जमले प्रेम करण्यास
रंगीत अशा या जीवनावरी
नवीन कोरे कपडे पांढरे
शेवटी कशास हो देहावरी?

आता कशास सांगा येते?
मज आठवून डोळ्यात पाणी
झाले जगून, संपले जीवन
शेवटी कशाला सुगंधीत पाणी?

ऐकली नेहमीच जगताना मी
रटाळ सारी ती जीवनगाणी
कधीच ना ती कोणी माझी
ऐकली होती जीवन कहाणी

जरी दिले सुख मी सार्‍यांना
होते रुसले सारे माझ्यावरी?
आता कशास उधळीत आहे
शेवटी फुले सुगंधी  देहावरी

अडकलो होतो बंधात नात्याच्या
सार्‍यांना संभाळत जीवन गेले
आहे आभार सार्‍यांचे माझ्यावर
अग्नी देऊन मज मोकळे केले

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ जून २०१७

Thursday 1 June 2017

मनाला झालेली जखम

शरीराच्या वेदना कमी तरी होतात पण मनाला झालेली जखम ही खोलवर रूतत जाते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे

वृत्त

वृत्त मात्रा U (१ मात्रा)   - (२ मात्रा)
१) श्री - वर्ग
१)  श्री ( - )
२)  मद (U U)
३)  सुख  (U -)
४)  दुःख  (U -)
५)  कमल (U U U)
६) स्री (- -)
७)  रजनी (U U -)
८)  मन्दर (- U U)
९)  मृगेंद्र (U - -)
१०) सुरतरू (U U U U)
२) इंद्रवज्रा वर्ग
इंद्रवज्रा - उपेंद्रवज्रा - वसंततिलका
११) इंद्रवज्रा (- - U - - | U U - U U -)
१२) आंदोलिका (- - U - - | U - U - -)
१३) आनंदशब्द (- - U - - | U U U U - U - -)
१४) केकिरव (U U - U U - | U U - U U -)
१५) उपेंद्रवज्रा (U - U - -  | U U - U - -)
१६) कोल (U - U U U - | U U - U - -)
१७) प्रतिष्ठित (U - U U U - | - - U - - )
१८) व्यवस्थित  (U - U U U - | - - U U U - -)
१९) समुपस्थिता (- - U U - | U U - U - -)
२०) वसंततिलका (- - U - U U U - | U U - U - -)
२१) ऋषभ (U U - U - U U U - | U U - U - -)
२२) शिशु (- - U U - U U U - | U U - U - -)
२३) स्वर्णाक्षी (- - - ! U - U U U - ! U U - U - -)
२४) केतन (- U U U - - U U - | U U - U - -)
२५) विमला (U U - U - -)
३)  इंद्रवंशा वर्ग
वंशस्थ - रूचिरा - प्रहर्षिणी
२६) इंद्रवंशा (- - U - - | U U - U - U -)
२७) सुदन्त (U U - U - - | U U - U - U - )
२८) वंशस्थ (U - U - - | U U - U - U -)
*२९) मत्र्जुभाषिणी ( U - U - - | U U U - U - U -)
*३०) मृदड्.ग (- - U - U U U - | U U - U - -)
*३१) लक्ष्मी  (- - U - ! U U U U - U - U -)
*३२) रुचिरा (U - U - ! U U U U - U - U -)
३३) रुक्मिणी (U - U - | U U U U - U - U - -)
३४) "सु"रुचिरा (U - U - ! U U U U - - U - - )
३५) प्रहर्षिणी (- - - ! U U U U - U - U - - )
*३६) म्लेत्र्छ (- - -  U U - U - U - U - -)
३७) घनमाला (U U - - ! U U U U - U - U - -)
३८) मधुमक्षिका (- U U - ! U U U U - U - U - -)
३९) रमा (U U U U - ! U U U U - U - U - -)
४०) "निर्मला" (U U - U - U - )
४)  रथोद्धता - वर्ग
प्रियंवदा - कनकप्रभा
४१) रथोद्धता (- U - U U U - | U - U -)
४२) प्रियंवदा (U U U - U U U - | U - U -)
४३) अभीष्ट (U U U - U U - | U - U -)
४४) ललिता ( - - U - U U U - | U - U -)
४५) कनकप्रभा (U U - U - U U U - | U - U -)
*४६) बुध्दुद (U U - U - U U U - | U - U - | - U - U -)
५)  स्वागता - वर्ग
लड्.का-कुटजा-प्रमिताक्षरा-यूथिका-द्रुतविलम्बित
४७) स्वागता (- U - U U U - | U U - -)
४८) द्रुतपदा (U U U - U U U - | U U - -)
४९) अम्बुज (- U U U - U U U - | U U - -)
५०) चन्द्रवर्त्म (- U - U U U - | U U U U -)
*५१) मणिरड्.ग - मणिरंग (- U - U U - | U U - -)
*५२) लड्.का (U U U - - - U | U U - -)
५३) कुटजा (U U - U - U U U - | U U - -)
५४) प्रमिताक्षरा (U U - U - U U - | U U -)
५५) प्रमिता (U U - U - U U U - | - )
५६) उत्थापनी (- - U - U U U - | U U - -)
५७) मणिकटक (U U U U - U - U U U - | U U  -)
५८) यूथिका (- U - U U U - | U U - U -)
५९) अच्युत (- U - U U - | U U  - U -)
६०) जनकात्मजा (U U U - U U U - | U U  - U -)
६१) द्रुतविलम्बित (U U U - U U - | U U  - U -)
६२) अभ्रक (- - U - U U U - | U U  - U -)
६३) कमलिनी  (U U - U - U U U - | U U  - U -)
६४) सुन्दर (- U - U U U - | U U - | U U  - U -)
*६५) मड्.गला (मंगला) (U U U - U U U -  | U U  - | U U  - U -)
६६) प्रगुणीकृता (U U U - U U -  | U U  - | U U  - U -)
६७) कुसुमाडि.घ्रप (U U U - U U - | U - | U U U - U -)
६) शालिनी - वर्ग
वातोर्मि - वैश्वदेवी - अनड्.गलेखा (अनगंलेखा)
६८) शालिनी (- - - - ! - U - - U - -)
६९) वातोर्मि (- - - - ! U U - - U - -)
७०) वैश्वदेवी (- - - - -  ! - U - - U - -)
७१) कोड्डम्भो (- - - - -  ! U U U - - U - -)
७२) चन्द्रिणी (U - - - - -  ! - U - - U - -)
७३) "राज"-लक्ष्मी ( - - - - U - - ! - U - - U - -)
७४) चित्रा (- - - - | - - - - ! - U - - U - -)
७५) पद्म (U U U U U - ! - - - -  ! - U - - U - -)
७६) चन्द्रमाला (U U U U U - ! - - - -  ! - U - - U - -)
७७) अनंलेखा (अनड्.लेखा) (U U U U U - ! - - - -  ! - U - - U - -)
७)  मंदाक्रांता - वर्ग
कुसुमितलता - स्रग्धरा - मालिनी
७८) चंद्रलेखा ( U U U U U - ! - U - - U - -)
७९) मंदाक्रांता (- - - - ! U U U U U - ! - U - - U - -)
८०) कुसुमितलता (- - - - -  ! U U U U U - ! - U - - U - -)
८१) विस्मिता ( U - - - - -  ! U U U U U - ! - U - - U - -)
८२) चित्रमाला (- - - - U - -  ! U U U U U - ! - U - - U - -)
८३) नन्दीमुखी (U U U U U U - ! - U - - U - -)
८४) चित्रलेखा (- - - - ! U U U U U U - ! - U - - U - -)
८५) पुष्पदाम  (- - - - -  ! U U U U U U - ! - U - - U - -)
८६) शोभा ( U - - - - -  ! U U U U U U - ! - U - - U - -)
८७) मुग्धक  ( U - - - - -  ! U U U U U U - !  U - - U - -)
८८) स्त्रग्धरा  ( - - - - U - -  ! U U U U U U - ! - U - - U - -)
८९) महास्त्रग्धरा ( U U - - - U - -  ! U U U U U U - ! - U - - U - -)
९०) मालिनी ( U U U U U U - - ! - U - - U - -)
९१) मालचित्र [शालिनी ! ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ - । - ~ - - ~ - -]
९२) सिंहविस्फूर्जित [- - - - - ! - - ~ ~ - - ! - ~ - - ~ - -]
९३( चूतकुज्ज [~ ~ - - - - - ~ - ~ ~ - ! - ~ ~ । - ~ - - ~ - -]
८ क्ष्मा वर्ग
कुटिलगति -शरभललिता-शिखरिणी-पुट
९४) क्ष्मा [~ ~ ~ ~ ~ ~ - ! - - - ~ - -]
९५) तत [~ ~ ~ ~ ~ ~ - ! - - - ~ -]
९६) नदी [~ ~ ~ ~ ~ ~ - ! - ~ ~ - ~ - -]
९७) चन्द्रकान्ता [- ~ - - ~ - - ! - - ~ ~ - ~ - -]
९८) चन्द्रिका [~ ~ ~ ~ ~ ~ - ! ~ - ~ - - -]
९९) वाहिनी [- - ~ ~ - - - ! - - ~ - -]
१००) भोगिनी [~ ~ ~ ~ ~ ~ - । ~ - ~ - - ~ - -]
१०१) कुटिलगति [~ ~ ~ ~ ~ ~ - ! - ~ - - ~ -]
१०२) शरभललिता [- - - - ! ~ ~ ~ ~ ~ - । - ~ - -]
१०३) प्रवरललिता [~ - - - - - ! ~ ~ ~ ~ ~ - ! - ~ - -]
१०४) शिखरिनी [~ - - - - - ! ~ ~ ~ ~ ~ - - ~ ~ ~ -]
१०५) चन्द्रकान्ति [~ ~ ~ ~ ~ ~ - ! - ~ - -]
१०६) पुट [~ ~ ~ ~ ~ ~ - - ! - ~ - -]
१०७) “कनक-"गौरी [~ ~ ~ ~ ~ ~ - - ! ~ ~ ~ - -]
१०८) गौरी [~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ । ~ ~ ~ - -]
१०९) क्षमा [~ ~ ~ ~ ~ ~ - - ! ~ - ~ - -]
११०) शिखण्डिनी [~ - - - - -]

९ अपरािजता-वर्ग

भाराक्रांता भुजडगविजृ भ्भित्त पिपीलिका

१११ लय [~ ~ ~ ~ ~ - ! ~ - ~ ~ - ~ -]

११२ भाराक्रांता [- - - - ! ~ ~ ~ ~ ~ - ! ~ - ~ ~ - ~ -]

११३ कांता [~ - - - ! ~ ~ ~ ~ ~ - ! ~ - ~ ~ - ~ -]
११४ कुरडिगका [- - - - - ! ~ ~ ~ ~ ~ - ! ~ - ~ ~ - ~ -]
११५ मकरन्दिका [~ - - - - - ! ~ ~ ~ ~ ~ - ! ~ - ~ ~ - ~ -]
११६ अपरािजता [ ~ ~ ~ ~ ~ ~ - ! ~ - ~ ~ - ~ -]
११७ चल [ - - - - ! ~ ~ ~ ~ ~ ~ - ! ~ - ~ ~ - ~ -]
११८ कथागति [- - ~ - ~ - - ! ~ ~ ~ ~ ~ ~ - ! ~ - ~ ~ - ~ -]
११९ उपमालिनी [~ ~ ~ ~ ~ ~ - - ! ~ - ~ ~ - ~ -]
१२० मणिमज्जरी [~ - - - ! ~ ~ ~ ~ ~ ~ - - ! ~ - ~ ~ - ~ -]
१२१ भुजंगविजृभ्भित [८ ग ! ८ ल ~ ~ - ! ~ - ~ ~ - ~ -]
१२२ प्रमोदमहोदय [४ ग ! - ~ ~ - - - - ! ८ ल ~ ~ - ! ~ - ~ ~ - ~ -]
१२३ पिपीलिका [८ अ ! १४ ल ग ! ~ - ~ ~ - ~ -]
१२४ पिपीलिका-करभ [८ ग ! १९ ल ग ! ~ - ~ ~ - ~ -]
१२५ पिपीलिका-पणव [८ ग ! २४ ल ग ! ~ - ~ ~ - ~ -] 
१२६ पिपीलिका -माला [८ ग ! २९ ल ग ! ~ - ~ ~ - ~ -]