पाऊस
मन वेडे गुंतले पागोळ्यांत
सुरू झाल्या पाऊस धारा
निरोप घेत उकाड्याचा कसा
वाहतो आहे खुशीत वारा
उल्हास दाटला चोहिकडे
लागले सजू डोंगर रान
नदी वाहते जोमात आता
सारे विसरती जगण्याचं भान
पहात होती धरती वाट
कसा येऊन गेला बिलगून
पाऊस होता उनाड-लबाड
धरतीला पहा गेला सजवून
तपश्चर्या मोठी संपली आज
धरेने घेतले पावसाला बाहूत
नटून थटून सजली धरणी
ऊठून दिसते हिरव्या शालूत
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ जून २०१७
No comments:
Post a Comment