Sunday 25 June 2023

काही सेकंदाची संधी

संधीचा फायदा घेऊन योग्य निर्णयावर विचारपूर्वक कृती केली तर मिळालेल्या काही सेकंदाच्या संधीमुळे आपलं आयुष्य बदलू शकतं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ जून २०२३

Monday 19 June 2023

शोध मायेचा


शोध मायेचा
By
Yallappa Kokane
Yallappa Kokane
Room No. 001, Ground Floor,
Jai Heights Co. Op. Housing Society Limited,
Samarth Nagar, Rameshwadi, Near KBL School,
Badlapur West – 421503
Mobile – 9892567264
Email – yallappa.kokane@yahoo.in
One liner
Title of short film – शोध मायेचा
Language- Marathi/ Duration 00:12:00:00
 बालपणात मुलीची ताटातूट झालेले आईवडील बर्‍याच वर्षांपासून आपल्या मुलीला शोधत आहे. तसेच मुलगी सुद्धा आपले सर्व प्रयत्न पणाला लावून आपल्या अधिकाराचा (पोलीस अधिकारी) वापर करून आईवडीलांना शोधत आहे. दोन तीन घटनांमधून आईवडील आणि मुलीची भेट होते पण आईवडील आणि मुलगी एकमेकांना ओळखत नसतात. ज्यावेळेस पोलीस अधिकारी असलेल्या मुलीला कळते की आपले आईवडील जिवंत आहे आणि दोन तीन घटनांमधून आपली भेट सुद्धा झाली आहे त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो. आईवडीलांची प्रत्यक्ष भेट होते तेव्हा आईवडीलांनी आपले प्राण सोडलेले असतात.
The End
Writer by – Yallappa Kokane
Dated - 06-06-2023
Casting List
Title of short film – शोध मायेचा
Language- Marathi/ Duration 00:12:00:00
Sr. No. Artist Name Character Name Age Group Character description/ Look & costume
१ जान्हवी २५ पोलिस अधिकारी/ दिसायला सुंदर/ पोलिसांची वर्दी
२ सखु ३७ जान्हवीची खरी आई, साधी राहणी/साधी साडी
३ रायबा ४२ जान्हवीचे खरे वडील, साधी राहणी/साधे कपडे
४ रावसाहेब ४३ जान्हवीचा संभाळ करणारे वडील / साधे/ पॅट शर्ट
५ मालतीबाई ३५ जान्हवीचा संभाळ करणारी आई/साधी/ साधी साडी
६ शिंदे हवालदार ३० उंच/रूबाबदार/शक्यतो मिशी असलेला
७ जमाव/गर्दी सर्व वयोगट तीन चार महिला व पुरूष. सर्व सामान्य
Writer by – Yallappa Kokane
Dated - 18-06-2023
One line script
Title of short film – शोध मायेचा
Language- Marathi/ Duration 00:12:00:00
SCENE NO : 1
ARTISTS
रावसाहेब
 मालतीबाई
घरामध्ये भिंतीवर सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, डॉ. आनंदी गोपाळ जोशी, मदर टेरेसा, किरण बेदी व कल्पना चावला यांचे छायाचित्रे आहेत. रावसाहेब व मालतीबाई घरात निवांत बोलत बसले आहेत. दोघांचे चहापान सुरू आहे.
SCENE NO : 2
ARTISTS
जान्हवी
चोर
चोरी करून पळत असलेल्या चोराला जान्हवी आपले धाडस दाखवून त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. चोर पुढे व जान्हवी मागे असा पाठलाग सुरू आहे. पाठीमागून जान्हवी चोराची काॅलर पकडते तेवढ्यात चोर आपल्या जवळचा चाकू काढतो आणि जान्हवीवर वार करतो. जान्हवीच्या दंडाला जखम होते आणि गुंड हातातून निसटून जातो.
Writer by – Yallappa Kokane
Dated - 11-06-2023
SCENE NO : 3
ARTISTS
जान्हवी
सखु
रायबा
जखम झाल्यामुळे जान्हवीच्या हाततली बंदूक खाली पडते. तिला झालेल्या जखमेतून खूप रक्त येत आहे. खाली पडलेली बंदूक उचलण्यासाठी ती वाकते तेवढ्यात सखु आणि रायबा समोर येतात. नकळत सखूचे दोन्ही हात सावरण्यासाठी आणि आशिर्वाद देण्यासाठी जान्हवीच्या डोक्याला स्पर्श करतात. आजूबाजूला काही नसल्यामुळे सखु साडीचा पदर फाडते आणि जान्हवीच्या दंडाला बांधते.
SCENE NO : 4
ARTISTS
जान्हवी
रावसाहेब
मालती
रात्री डोळे मिटून जान्हवी पलंगावर आडवी पडली आहे. आजही तिला नेहमी प्रमाणे रडत असलेली लहान मुलगी स्वप्नात दिसते. ती मुलगी वयाने तीन चार वर्षाची आहे. ती हरवलेली आहे आणि आपल्या आई वडीलांचा शोध घेत आहे. जान्हवी घाबरून उठते. तिच्या आवाजाने रावसाहेब आणि मालती धावत तिच्याकडे येतात. थोड्या वेळाने मालती जान्हवीला दुधाचा ग्लास आणून देते. ते दूध पिऊन जान्हवी झोपी जाते.
Writer by – Yallappa Kokane
Dated -11-06-20203
SCENE NO : 5
ARTISTS
जान्हवी
रावसाहेब
मालती
सकाळी जान्हवी पोलिस स्टेशनला जाण्यासाठी पोलिसाच्या गणवेशात ती तयारीत आहे. रावसाहेब व मालती यांच्या समवेत ती सकाळचा नास्ता करीत आहे. नास्ता करताना आदल्या दिवशी हातातून निसटलेल्या गुंडाचा विषय जान्हवी काढते. त्यावर थोडी चर्चा होते. व रात्री स्वप्नात दिसणार्‍या मुलीची चर्चा होते.
SCENE NO : 6
ARTISTS
जान्हवी
सखु
रायबा
शिंदे हवालदार
पोलीस स्टेशनमध्ये शिरताना सखु आणि रायबा तेथून बाहेर जाताना जान्हवी पाहते. पटकन तिला आदल्या दिवशीची घटना आठवते. सखु तिच्या जखमांवर पट्टी बांधताना जान्हवीला आठवतं. त्यांना आवाज देण्यासाठी ती मागे फिरते पण ते दोघे दूर निघून गेलेले असतात. पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या हवालदाराला जान्हवी ते दोघे येण्याचं कारण विचारते. हवालदाराकडून कळतं की २२ वर्षापूर्वी या दोघांनी आपली मुलगी हरवली आहे अशी तक्रार केली होती. पण अजूनही ती मुलगी त्यांना सापडली नाही.
Writer by – Yallappa Kokane
Dated - 12-06-2023
SCENE NO : 7
ARTISTS
जान्हवी
शिंदे हवालदार
जान्हवी ही शिंदे हवालदाराला जूनी नोंद वही काढायला सांगते. २२ वर्षापूर्वी मुलगी हरवलेली जितके काही तक्रारी आल्या होत्या त्या सर्व तक्रारीतून सखु आणि रायबा यांच्या मुलीचा शोध जान्हवी घेण्याचा प्रयत्न करते. शोध घेताना जान्हवीला एका तक्रारीत स्वतःच्या लहानपणाचे छायाचित्र नजरेस पडते. जान्हवीला तिच्या घरी असलेले स्वतःचे छायाचित्र नजरेसमोर येते. घरातल्या छायाचित्ररात व पोलीस स्टेशन मध्ये सापडलेले छायाचित्रात काहीच फरक वाटत नाही. आणि त्याच बरोबर पुन्हा एकदा नेहमी स्वप्नात रडत असलेली मुलीचा चेहरा दिसतो आणि रडण्याचा आवाजही येतो. छायाचित्र जळणे हा फक्त योगायोग असावा असे जान्हीला वाटते.
SCENE NO : 8
ARTISTS
जान्हवी
रावसाहेब
मालती
जान्हवीने आज साडी परिधान केली आहे. ती, मालती आणि रावसाहेब एकत्र रस्त्याने चालत आहे. तिच्या मनात एकच विचार सारखा घोळत असतो की ती सखु आणि रायबा यांच्या का विचारात आहे? सखु आणि रायबाचा जान्हवीला शोध का घ्यावासा वाटतो? जान्हवी भानावर नसते हे मालती आणि रावसाहेब यांच्या लक्षात येतं. जान्हवीला मालती भानावर आणते. जान्हवी ही सखु आणि रायबा बद्दल तिच्या मनात असलेल्या भावना बोलून दाखवते.
Writer by – Yallappa Kokane
Dated - 13-06-2023
SCENE NO : 9
ARTISTS
जान्हवी
रावसाहेब
मालती
सखु
रायबा
रस्ताने चालत असताना दुरवर एका वळणावर जान्हवीला सखु आणि रायबा दिसतात. जान्हवी ही सखु आणि रायबाकडे बोट दाखवत रावसाहेब आणि मालती यांना दाखवण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत सखु आणि रायबा नजरेआड होतात. जान्हवी ही रावसाहेब आणि मालती यांना पुढे घरी जाण्यास सांगते आणि स्वतः सखु आणि रायबा यांच्या दिशेने जाते. जान्हवी पुढे गेल्यावर तिला कोणीही दिसत नाही. जान्हवी नाराज होते.
SCENE NO : 10
ARTISTS
सखु
रायबा
आज सखु रायबा यांच्या मुलीचा वाढदिवस आहे. दरवर्षी हे दोघे आपल्या हरवलेल्या लेकीचा वाढदिवस साजरा करतात. घरात आनंदी वातावरण आहे. सखु रायबाला घरात गोड पदार्थ करण्यासाठी वस्तु आणण्यास सांगते. रायबा एक पिशवी घेऊन सामान आणण्यास घराच्या बाहेर पडतात. आजही सखु आणि रायबा यांना विश्वास आहे की आपल्या मुलीची कधी ना कधी भेट होईल याच विश्वासावर दोघे जीवन जगत आहे.
Writer by – Yallappa Kokane
Dated - 17-06-2023
SCENE NO : 11
ARTISTS
जान्हवी
 सखु
रायबा
दोन व्यक्ती
जान्हवी रस्ताने चालत आहे. जान्हवीला एका रस्ता अपघाताची बातमी फोनवरून मिळते. अपघाताच्या स्थळी जान्हवी ताबडतोब पोहचते. एक मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. मृतदेहाभोवती दोघेजण उभे आहेत. दोघांना बाजूला सारून जान्हवी पुढे जाते व मृत व्यक्तीचा चेहरा पाहते. ती मृत व्यक्ती रायबा आहे. जान्हवीला मोठा धक्का बसतो. पण ती स्वतःला सावरते. एका वाहनाने रायबाला धडक दिली आहे असे तेथे असलेल्या एका व्यक्तीकडून जान्हवीला कळते.
SCENE NO : 12
ARTISTS
सखु
एक व्यक्ती (शेजारी)
सखुचा शेजारी जोरात धावत सखुच्या घराकडे येत आहे. घराजवळ येता येताच मोठमोठ्याने सखुला हाक मारत आहे. शेजारी घाबरलेला आहे. शेजाऱ्याला घाबरलेला पाहून सखुला खूप भीती वाटते. शेजारी सखुला रायबाच्या अपघाती मृत्यूची बातमी देतो. रायबाच्या मृत्यूची बातमी ऐकून सखु मोठ्याने रडायला लागते. शेजारी सखुला सावरण्याचा प्रयत्न करतो.
Writer by – Yallappa Kokane
Dated - 17-06-2023
SCENE NO : 13
ARTISTS
जान्हवी
शिंदे हवालदार
शिंदे हवालदार हे पोलीस स्टेशनमध्ये आहेत. त्यांना जान्हवीचा फोन येतो व. जान्हवी अपघाताच्या घटनास्थळी शिंदेना येण्यास सांगते. घाईघाईत शिंदे हवालदार आपली काठी घेऊ निघणार तेवढ्यात जान्हवीच्या टेबलावर शिंदे हवालदार यांची नजर जाते. जान्हवीला रोजनिशी (डायरी) लिहायची सवय आहे. डायरी उघडी होती. सखु आणि रायबा हे जान्हवीचे आई वडील आहेत असे जान्हवीने त्या डायरीत लिहले होते. शिंदे हवालदार खुश होतात आणि आनंदाने तेथून निघतात.
SCENE NO : 14
ARTISTS
जान्हवी
शिंदे हवालदार
रायबा
दोन व्यक्ती
शिंदे हवालदार घटनास्थळी पोहचतात. रायबाला मृत अवस्थेत पाहून शिंदे हवालदारांना मोठा धक्का बसतो कारण रायबा व सखु हे पोलिस ठाण्यात आपल्या मुलीची चौकशी करण्यास येत होते हे त्यांना आठवतं. जान्हवीला जन्म दिलेले आईवडील हे सखु आणि रायबा आहेत हे आता शिंदे हवालदार यांना कळाले आहे. जान्हवीला कसा आधार देऊ हेच शिंदे हवालदार यांना समजत नव्हते. ते सुद्धा फार दुःखी आहेत. दोघांच्या डोळ्यात पाणी आहे. शिंदे हवालदार यांच्या डोळ्यात पाणी पाहून जान्हवी ही डोळ्यांच्या भाषेने बोलण्याचा प्रयत्न करते. शिंदे हवालदार जान्हवीला सांगतात की सखु आणि रायबा हे जान्हवीचे जन्म दिलेले आईवडील आहेत हे त्यांचा आत्ताच कळाले आहे.शिंदे हवालदार जान्हवीला आधार देतात. जान्हवी ही स्वतःचे डोळे पुसत शिंदे हवालदार यांना मृतदेह ताब्यात घेण्यास सांगते. रायबाच्या नातेवाईकांना कळवून येते असं जान्हवी सांगून पुढे निघून जाते. मृत देहाजवळ उभे असणाऱ्यांशी जान्हवी रायबाच्या नातेवाईकांची माहीती घेण्याचा प्रयत्न करते. जान्हीवीला रायबाच्या घराची माहीती मिळते व ती रायबाच्या घराकडे जाण्यास निघते.
Writer by – Yallappa Kokane
Dated - 14-06-2023
SCENE NO : 15
ARTISTS
जान्हवी
 सखु
दोन तीन महीला व पुरूष मंडळी
जान्हवी रायबाच्या घराच्या दिशेने जात आहे. दरम्यान जान्हवीला जुने भास होऊ लागतात. एक रडणार्‍या लहान मुलीचा चेहरा समोर येतो. त्या रडण्याच्या आवाजाने जान्हवी अस्वस्थ होते. सखुच्या घरी जान्हवी पोहचते. दोन तीन महिला व पुरूष मंडळी रायबाच्या दारात उभी असतात. त्यांना बाजुला सारून जान्हवी घरात शिरते. समोरचे दृश्य पाहील्या पाहील्या जान्हवीवर दुखःचा डोंगर कोसळतो. सखुने स्वतःला संपवलेले आहे. शेजाऱ्यांकडून सखुला कळाले होते की रायबाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तिला हा आघात सहन झाला नाही व तिने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याअगोदर सखुने चिठ्ठी लिहली आहे. "आपल्याला आता कोणाचा सहारा नाही म्हणून मी माझे जीवन संपवत आहे." असे त्या चिठ्ठीत नमुद केले आहे. हे सारं जान्हवीला सहन झाले नाही. ती घराच्या बाहेर धावत येते व थोडी बाजूला होऊन मोठा टाहो फोडते. आपल्याला आईवडीलांची माया मिळाली नाही याचं दुःख जान्हवीला होतं. मायेचा शोध घेणारी जान्हवी एकटीच उभी राहून रडत आहे.
SCENE NO : 16
ARTISTS
जान्हवी
सखु आणि रायबा यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी जान्हवी त्यांच्या घरात काही पुरावे सापडतात का हे प्रयत्न करीत असते. घरात खुप शोधाशोध करूनही काहीच सापडलं नाही. अचानक जान्हवीची नजर भिंतींवर टांगलेल्या पिशवीवर पडते. त्या पिशवीत काही कागतपत्रे आहेत व काही छायाचित्रे आहेत. त्या कागदपत्रांमध्ये जान्हवी ही सखु रायबाची मुलगी आहे असे पुरावे सापडतात. एक दोन छायाचित्रात जान्हवी लहान असताना सखु आणि रायबाबरोबरचे छायाचित्र सापडतात. सखु आणि रायबा हे जान्हवीचे जन्मदाते आहेत हे सिद्ध झाले आहेत.
समाप्त
Writer by – Yallappa Kokane
Dated – 17-06-2023
Dialogues
Title of short film –शोध मायेचा
Language- Marathi/ Duration 00:12:00:00
SCENE NO : 1 ARTISTS
 INT.ROOM. DAY. मालतीबाई, रावसाहेब
मालतीबाई
चहा घ्या.
रावसाहेब
वाह दे
मालतीबाई
अहो ऐकलं का?
तो पेपर बाजूला ठेवा आणि मी काय सांगते ते ऐका आधी!
रावसाहेब
बोल, ठेवला पेपर बाजूला
मालतीबाई
एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? आपली जान्हवी आता मोठी झाली आहे. मुलगी असून ती आपलं सारं घर संभाळते. आपल्याला कशाचीच कमतरता भासू देत नाही.
रावसाहेब
खरं आहे तुझं. मलाही नेहमी असंच वाटतं की, आपण खूप भाग्यवान आहोत. तुला माहीत आहे का? मालू, अजूनही काही ठिकाणी मुलगी झाली म्हटल्यावर लोकं नाराज होतात. आणि "मुलगा झाला असता तर बरं झालं असतं". असे म्हणतात. घराला वारस मिळाला की लोकं खुश होतात.
मालतीबाई
खरं सांगू तुम्हाला, जान्हवीला पाहिल्यावर कुठलाही भेदभाव मनात येत नाही. सर्वकाही विसरायला होतं.
रावसाहेब
(हसत) मुलगी कुणाची आहे.
मालतीबाई
आपण आता जान्हवीच्या लग्नाचा विचार करायला हवा.
रावसाहेब
अगदी माझ्या मनातही हेच आहे! जान्हवी आली की आपण तिच्याशी बोलून घेऊ या विषयावर. आता जान्हवी येण्याची वेळसुद्धा झालेली आहे.
SCENE NO : 2 ARTISTS
 EXT.ON ROAD. DAY. जान्हवी, चोर
SCENE NO : 2 मध्ये संवाद नाही.
SCENE NO : 3 ARTISTS
 EXT.ON ROAD. DAY. जान्हवी,सखु,
                                                        रायबा
जान्हवी
आई गं!
सखु
पोरी, बस जरा शांत. मी तुझ्या दंडाला पट्टी बांधते.
जान्हवी
अहो आई, राहू द्या
(आई म्हणाल्यावर सखु आणि रायबाला आनंद होतो.)
सखु
पोरी थांब, आई म्हणालीस ना मला. मग जरा आईचं थोडं ऐक. होईल लवकर बरं. मी जखमेवर पट्टी बांधून देते.
जान्हवी
मी तुम्हाला आई म्हणाल्यावर तुम्ही एकमेकांकडे पाहून खुश झालात. असं का! मला नाही समजलं.
सखु
(जान्हवीच्या हाताला पट्टी बांधत)
मला कोणी आई आणि यांना (रायबाकडे बोट दाखवत) बाबा म्हणाले ना आम्हाला आनंद होतो. कारण माझी मुलगी लहान असताना हरवली आहे. आज जर ती आमच्यासमोर असती तर अगदी तुझ्याच वयाची असती. म्हणून आम्हाला आनंद झाला.
SCENE NO : 4 ARTISTS
 INT.ROOM. NIGHT. जान्हवी, मालती,
                                                        रावसाहेब
जान्हवी
(घाबरून जागी होते आणि मोठ्या आवाजात ओरडते)
आईईईईईई......
मालती
(जान्हवी जवळ येत)
काय गं काय झालं. इतकी घाबरलीस का?
जान्हवी
मला स्वप्नात नेहमी एक लहान मुलगी रडताना दिसते. आणि कानात तिच्या रडण्याचा आवाज घुमत असतो. त्या मुलीचा आणि माझा काय संबंध आहे हेच मला कळत नाही.
मालती
अगं, आपण जर एकाच गोष्टीचा सारखा विचार केला की, ती गोष्ट आपल्यासोबत घडायला लागते. ती चांगली असो वाईट. आपण ज्याचा खूप अंतरमनाने विचार केला की, ती गोष्ट आपल्या मिळूनही जाते. तसं तुझं झालंय बघ. तुझे जन्मदाते तू लहान असतानाच तुझ्यापासून दूरावले गेले. म्हणून तुला असे भास सारखे सारखे होतात.
रावसाहेब
(जान्हवीच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत)
होय जान्हवी, हे खरं आहे. भले तुझा अशा गोष्टींवर विश्वास नसेल तरी हे सत्य आहे. तुझी आई जे काही सांगते ते अगदी खरं आहे.
मालती
तू अशीच शांत पडून रहा. मी तुझ्तासाठी दूध घेऊन येते. दूध प्यायल्यावर शांत येईल.
(थोडक्याच वेळात)
हे घे दूध. पिऊन शांत झोप. बरं वाटेल तुला.
SCENE NO : 5 ARTISTS
INT.ROOM. DAY. जान्हवी, मालती,
                                                        रावसाहेब
 मालती
कसं वाटतंय आता तुला. तब्येत बरी आहे ना.
जान्हवी
हो आई, आता मी बरी आहे.
काल माझ्या हातून एक गुंड निसटला. त्याचा आज शोध घ्यायचा आहे. याच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारून हैराण करून सोडलं आहे.
रावसाहेब
पोलिस खात्यात अशा गोष्टीला तर सामोरं जावंच लागतं.
SCENE NO : 6 ARTISTS
INT.POLICE STATION. DAY. जान्हवी,
                                                         शिंदे हवालदार
जान्हवी
(पोलिस ठाण्यात प्रवेश करत)
शिंदे
शिंदे हवालदार
(जान्हवीला सलाम ठोकत)
जय हिंद
जान्हवी
जय हिंद
हे जोडपे येथे का आले होते
शिंदे हवालदार
काही वर्षांपुर्वी त्यांची मुलगी हरवली होती आणि या जोडप्यांनी तशी आपल्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मुलीचा शोध कुठपर्यंत आला आहे त्याची चौकशी करण्यास ते दोघे येथे आले होते.
जान्हवी
एकदा मला त्यांची तक्राराची पुर्ण माहिती सांगा आणि फाईल माझ्याकडे घेऊन या.
शिंदे हवालदार
ठीक आहे. लगेच घेऊन येतो.
SCENE NO : 7 ARTISTS
INT.POLICE STATION. DAY. जान्हवी,
                                                         शिंदे हवालदार
शिंदे हवालदार
 मॅडम, ही घ्या फाइल. यात सारी माहिती आहे.
जान्हवी
धन्यवाद शिंदे
SCENE NO : 8 ARTISTS
EXT.ON ROAD. DAY. जान्हवी,
                                                         मालती, रावसाहेब
मालती
(जान्हवीच्या दंडाला स्पर्श करत भानावर आणते)
काय झाले. इतका कोणता विचार करते आहेस.
जान्हवी
काल एक जोडपे ठाण्यात आले होते. त्यांनी त्यांची मुलगी हलवलेली तक्रार वीस-बावीस वर्षापूर्वी केली होती त्यांच्या मुलीचा शोध कुठपर्यंत आला आहे हे पाहण्यास ते आले होते.
रावसाहेब
मग काय सुगावा लागला का?
जान्हवी
आमच्या टीमचे संपूर्ण प्रयत्न सुरू आहे.
(मालती कडे पाहत)
आई तू म्हणतेस ना की एखाद्या गोष्टीचा सारखा विचार केला की त्याचे मार्ग आपोआपच सापडतात आणि ते काम पुर्ण होतं. तसचं आता काहीतरी घडायला हवं. मला त्या जोडप्यास त्यांची मुलगी शोधून द्यायची आहे. माझेही तसे प्रयत्न सुरू आहेत.
रावसाहेब
जान्हवी, होईल सर्व काही ठीक. यात आमची काय मदत हवी असल्यास ते देखील सांग. आम्ही आहोत तुझ्या सोबत.
SCENE NO : 9 ARTISTS
EXT.ON ROAD. DAY. जान्हवी,
                                                         मालती, रावसाहेब
जान्हवी
( रावसाहेब व मालती यांच्याकडे पाहत)
आई बाबा, तुम्ही पुढे चला मी आलेच. मला आत्ताच ते दोन जोडपे दिसले आहेत. मी त्यांना भेटून येते.
मालती
बरं ठीक आहे.
(रावसाहेबांकडे पाहत)
चला आपण पुढे जाऊ
रावसाहेब
हो चल, आपण निघूया
SCENE NO : 10 ARTISTS
INT.ROOM. DAY. सखु, रायबा
सखु
(सखुच्या डोळ्यात आनंद अश्रु आहेत)
अहो, ऐकलात का?
आज आपल्या मुलीचा वाढदिवस आहे. ती जर आपल्या सोबत असती तर आपण एकत्र तिचा वाढदिवस साजरा केला असता.
लहान असताना ती आपल्यापासून दुरावली आहे. आज ती कशी दिसत असेल?
रायबा
सुंदर परीसारखी दिसत असेल!
सखु
आपण आज घरात काहीतरी गोड पदार्थ करूया. तुम्ही बाहेरून साखर घेऊन या. मी पाहते काय करायचं आहे. या लवकर.
(दोघांची नजर घरात असलेल्या छायाचित्रावर जाते. त्यात लहान मुलगी आहे)
(ते छायाचित्र पाहत)
रायबा
हो, आता लगेच घेऊन आलो. आपल्या लेकीचा वाढदिवस आपण साजरा करूया.
SCENE NO : 11 ARTISTS
EXT.ON ROAD. DAY. जान्हवी,
                                                      शिंदे हवालदार
जान्हवी
हॅलो
हा बोला
आम्ही ताबडतोब आलो तेथे
(जान्हवी शिंदे हवालदारांना फोन करून अपघाताची बातमी देते)
शिंदे, तुम्ही ताबडतोब नाक्यावर या. एका रोड अपघाताची बातमी आली आहे. मी पोहचते तेथे. तुम्ही ताबडतोब या.
शिंदे हवालदार
हो मॅडम, लगेच आलो.
SCENE NO : 12 ARTISTS
EXT.ON ROAD. DAY. सखु,
                                                         सखुचा शेजारी
सखुचा शेजारी
(सखुच्या घराकडे जोरात धावत येत आहे. आणि ओरडत येत आहे)
वहिनी, ओ वहिनी नीनीनीनी........
(सखुचा शेजारी धापा टाकत सखुच्या दारात येत आहे. सखु दारात उभी आहे)
सखु
काय झालं दादा, इतके घाबरलेले का आहात तुम्ही
सखुचा शेजारी
वहिनी लवकर चला. तिथे नाक्यावर रायबा दादाचा अपघात झाला आहे. रायबा दादा आपल्याला सोडून गेले.
(सखु दारातच कोसळते आणि जोरात रडायला लागते)
SCENE NO : 13 ARTISTS
INT.POLICE STATION. DAY. शिंदे हवालदार
शिंदे हवालदार
(काठी घेऊन घाईत निघताना त्यांची नजर जान्हवीच्या टेबलावर पडते. जान्हवीच्या रोजनिशीकडे पाहत)
शिंदे हवालदार
(स्वतःशीच बोलत आहे)
हे काय आहे. मॅडमची रोजनिशी दिसते. पाहू या तर मॅडम ने आज काय लिहिलंय.
(रोजनिशी कडे पाहत आणि वाचत)
“आज मी खुप खुश आहे. सखु आणि रायबा हे माझे जन्मदाते आहे. हे मला कळाले आहे.”
(स्वतःशीच बोलत आहे)
हे आपल्या कळालं आहे. हे मॅडमला नको कळायला. आपण मॅडमला एक सरप्राईज देऊ या. एवढी मोठी आनंदाची बातमी मॅडमने माझ्याकडून लपवून ठेवली काय!
(आनंदाने हसत हसत शिंदे हवालदार पोलीस स्टेशनच्या बाहेर पडतात.)
SCENE NO : 14 ARTISTS
EXT.ON ROAD. DAY. जान्हवी,
                                                         शिंदे हवालदार,
                                                      दोन व्यक्ती
जान्हवी
(शिंदे हवालदार यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून)
काय झालं शिंदे, तुमच्या डोळ्यात पाणी?
शिंदे हवालदार
कसं सांगू मॅडम तुम्हाला
जान्हवी
काय झालं! ही व्यक्ती तुमच्या जवळची आहे का?
शिंदे हवालदार
हो, जवळची आहे. तुमचा फोन आल्यावर मी निघताना तुमच्या टेबलावर असलेल्या रोजनिशीवर नजर गेली.
(जान्हवीच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे)
शिंदे हवालदार
(मृतदेहाकडे हात दाखवत)
हे तुमचे जन्मदाते वडील आहेत हे मला आत्ताच कळालं आहे.
(जान्हवीला शब्दाने आधार देत)
मॅडम, संभाळा स्वतःला.
तुमची आई कुठे आहे. कळालं का काही?
जान्हवी
(डोळ्यातील पाणी पुसत)
शिंदे एक काम करा. हे मृतदेह ताब्यात घ्या. मी माझ्या आईचा शोध घेते. तुमचं हे काम झालं की ताबडतोब मला फोन करा.
(असं सांगून जान्हवी तेथे जमलेल्या दोन व्यक्तीच्या दिशेने जाते.)
जान्हवी
(मृतदेहाकडे बोट दाखवत)
हा अपघात कसा झाला हे तुम्ही पाहिलं का?
एक व्यक्ती
हो मॅडम, एक भरधाव वाहन येऊन यांना धडक दिली. ते वाहन थांबलं नाही. सरळ निघून गेलं.
जान्हवी
ती गाडी कशी होती. गाडी नंबर तुम्ही पाहिलात का?
एक व्यक्ती
पांढर्‍या रंगाची चार चाकी होती. ती फार जोरात निघून गेल्यामुळे गाडीचा नंबर पाहता आला नाही.
जान्हवी
कोणत्या दिशेने गेली ती गाडी?
एक व्यक्ती
(बोटाने रस्ता दाखवत)
मॅडम, ह्या दिशेने गेली ती गाडी.
जान्हवी
(खिशातून एक डायरी काढते व त्यावर लिहू लागते)
तुम्ही कुठे राहता
दोन्ही व्यक्ती
येथे जवळच
जान्हवी
आम्हाला तुमची मदत लागेल. तुमचं नाव आणि संपर्क क्रमांक या डायरीत लिहून द्या. प्रत्यक्षदर्शी म्हणून काही गरज लागली तर आम्ही तुमहाला बोलवून घेऊ
दोन्ही व्यक्ती
(डायरीवर लिहत)
ठीक आहे मॅडम, काही हरकत नाही.
जान्हवी
(मृत देहाकडे हात करत)
ही व्यक्ती कुठे राहते. काही माहिती आहे का?
एक व्यक्ती
(बोटाने रस्ता दाखवत)
हो मॅडम? त्या तिकडे राहतात ते.
जान्हवी
चला, तुम्ही मला त्यांच्या घरी घेऊन चला.
एक व्यक्ती
हो मॅडम, चला
SCENE NO : 15 ARTISTS
INT.ROOM. DAY. जान्हवीवर
                                                  एक शेजारी
जान्हवी
यांनी आत्महत्या का केली?
शेजारी
मॅडम, यांना त्यांच्या नवर्‍याच्या अपघाती निधनाची बातमी समजली. ते दुःख त्यांना सहन झालं नाही म्हणून त्यांनी स्वतःला संपवलं आहे.
SCENE NO : 16 ARTISTS
INT.ROOM. DAY. जान्हवी
SCENE NO : 16 मध्ये संवाद नाही.
समाप्त
Writer by – Yallappa Kokane
Dated – 18-06-2023
..............................................................................................................................................