Wednesday 27 December 2023

समाधान

एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ती गोष्ट तिथेच सोडून द्यावी. कालांतराने त्याचे समाधान प्राप्त होतं. कारण त्रास देणाऱ्या गोष्टीचे पर्याय सापडलेले असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ डिसेंबर २०२३

Sunday 24 December 2023

माणूसपण

माणूस म्हणून सर्वच जन्माला येतात पण माणसातले माणूसपण जिवंत ठेवून जो जगण्याचा प्रयत्न करतो तो कधी दुःखी होत नाही.

Thursday 21 December 2023

चेहऱ्यामागचे चेहरे

रोजच्या प्रवासात हजारो चेहरे दिसतात. त्यांची भीती कधीच जाणवत नाही. पण रोजच्या संपर्कात असलेल्या चेहऱ्यामागचे चेहरे ओळखताना खूप त्रास होतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ डिसेंबर २०२३

Wednesday 20 December 2023

श्वासातील अंतर

श्वासातील अंतर

श्वासातील अंतर कमी होते
नकळत तू समोर आल्यावर
भान हरवून जातो मी नेहमी
दोघांची नजरभेट झाल्यावर 

मन वेडापिसा होऊन जातो
तुला चोरून नेहमी पाहताना
मनातलं सारं मनातच राहतं
तुला सांगायचं धाडस करताना

तुझं एक हास्य पुरेसं आहे
मनी आशा घेऊन जगताना
आनंदही तसा फार होतोच
जुन्या आठवणीत झुरताना

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० डिसेंबर २०२३

Saturday 16 December 2023

स्तुती आणि निंदा

"स्तुती" ही नेहमी आपलीच माणसं करतात आणि "निंदा" ही आपले पणाचं ढोंग करणारी माणसं करतात.

Thursday 14 December 2023

शरीराची राख

आपल्या शरीराची राख होणार आहे हे माहीत असूनही मनामध्ये राग, रुसवा ठेवून जगणे म्हणजे स्वतःला जिवंतपणी जाळण्यासारखे आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ डिसेंबर २०२३

Tuesday 12 December 2023

त्रास देणारे विचार

आवडत्या कामात मन गुंतवलं की त्रास देणाऱ्या विचारातून मोकळं होता येतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ डिसेंबर २०२३

Saturday 9 December 2023

मनावर राज्य

एखाद्या व्यक्तीवर रागावून आपली स्वतःची किंमत कमी करून घेण्यापेक्षा त्याला विश्वासात घेऊन त्याची समजूत काढल्यास त्याच्या मनावर राज्य करता येतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० डिसेंबर २०२३

Friday 8 December 2023

विचारांशी झुंज

माणूस बाहेरून जितका शांत दिसतो तितकाच तो मनाने फार बेचैन असतो कारण शांत राहण्यासाठी तो मनात सुरु असलेल्या विचारांशी झुंज देत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८ डिसेंबर २०२३

Monday 4 December 2023

अर्धवट सत्य आणि संशय

अर्धवट सत्य आणि बळावलेल्या संशयामुळे नात्यात दुरावा निर्माण होण्याची दाट शक्यता असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ डिसेंबर २०२३