सुगंधीत पाणी
नाही जमले प्रेम करण्यास
रंगीत अशा या जीवनावरी
नवीन कोरे कपडे पांढरे
शेवटी कशास हो देहावरी?
आता कशास सांगा येते?
मज आठवून डोळ्यात पाणी
झाले जगून, संपले जीवन
शेवटी कशाला सुगंधीत पाणी?
ऐकली नेहमीच जगताना मी
रटाळ सारी ती जीवनगाणी
कधीच ना ती कोणी माझी
ऐकली होती जीवन कहाणी
जरी दिले सुख मी सार्यांना
होते रुसले सारे माझ्यावरी?
आता कशास उधळीत आहे
शेवटी फुले सुगंधी देहावरी
अडकलो होतो बंधात नात्याच्या
सार्यांना संभाळत जीवन गेले
आहे आभार सार्यांचे माझ्यावर
अग्नी देऊन मज मोकळे केले
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ जून २०१७
No comments:
Post a Comment