आठवणीची मिठी
आठवणी तुझ्या रोज
मिठी मारून जातात
तू जवळ असण्याचे
भास होऊन जातात
सवय झाली आहे
वळणावर थांबायची
नजरेत कैद करून
तुला हृदयी जपायची
डोळ्यातले भाव तुझ्या
समजतात सारे मलाही
वेडा जीव तुझ्यासाठी
कधी कळणार तुलाही?
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ मार्च २०२०
No comments:
Post a Comment