Thursday, 1 March 2018

पाऊस पडतो रिमझिम

पाऊस पडतो रिमझिम, सखे भिजलं तुझं अंग।।
खट्याळ वारा तुझ्यासंगे, खेळे आज होऊनी दंग।।धृ।।

साद घालतो वारा, शीळ घालून गातो
आहे लबाड वारा स्पर्शून तुजला जातो
छान पसरली नक्षी आकाशी, इंद्रधनु फेकतो रंग।।
खट्याळ वारा तुझ्यासंगे, खेळे आज होऊनी दंग।।१।।

केस ओले गालावरी, पसरली ओठावर लाली
तारूण्य करी घायाळ, ही काय जादू झाली
वेड्या जीवास राणी किती वेड लावशील सांग ।।
खट्याळ वारा तुझ्यासंगे, खेळे आज होऊनी दंग।।२।।

पाऊस पडतो ओलाचिंब, सखे भिजलं तुझं अंग।।
खट्याळ वारा तुझ्यासंगे, खेळे आज होऊनी दंग।।धृ।।

– यल्लप्पा कोकणे
०१ मार्च २०१८

No comments:

Post a Comment