Friday, 30 March 2018

राम झालो मी कधी घनश्याम झालो मी

राम झालो मी कधी घनश्याम झालो मी
जन्म कुठलाही मिळो, बदनाम झालो मी !

सांग तारुण्या तुला हे काय झाले रे ?
भेटले कोणीतरी बेफाम झालो मी

काम करतानासुध्दा मी गात मी होतोना
नेहमी दुःखा, तुझा आराम झालो मी

फेकशी माझ्याकडे उद्ध्वस्त स्वप्नांना
का तुझ्यासाठी जगा गोदाम झालो मी ?

आठवायाला तुला मी विसरलो कोठ?
एवढा अजुनी कुठे उद्दाम झालो मी?

टाकले बदलून येथे तू मला जेव्हा
जग कुणी बदलेल यावर ठाम झालो मी

राहिलो साधा इथे मी, पाळली वचने
अन् जगायाचा नवा आयाम झालो मी

मी कशासाठी निघावे तीर्थयात्रेला?
गझल लिहितानाच चारीधाम झालो मी

— प्रदीप निफाडकर

No comments:

Post a Comment