Sunday, 16 April 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

सार्‍या क्षणात आता भोगून त्रास गेली
ती वेळ आज माझी होऊन खास गेली

चाहूल आज आली पाऊल वाजल्याची
भारी अदा तुझी ही रोखून श्वास गेली

मी फायदा कधीही ना घेतला कुठेही
संधीच एक मजला लावून ध्यास गेली

झाले जगून आता सोडून आज जातो
ती काळजी कुणाची वाढून आस गेली

नाही मला कुणाची चिंता करायची ती
आनंद फार सारी देऊन खास गेली

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ जून २०१७

No comments:

Post a Comment