आनंदकंद
गा गा ल गा ल गा गा....गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २ ....२ २ १ २ १ २ २ =२४
गा गा ल गा ल गा गा....गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २ ....२ २ १ २ १ २ २ =२४
आधार मी जगाला देऊन फार झाला
त्यालाच आज माझा का भार फार झाला?
गोडी कुठेच नाही नात्यात रोज आता
शब्दात गोडवाही केव्हाच ठार झाला
आत्ताच चांदण्याचा झाला सुरू पहारा
भेटून जा सखे तू अंधार फार झाला
झाली तयार होती केव्हाच ढाल माझी
माझीच बेफिकीरी आत्ताच वार झाला
जा पाखरा घरी तू अंधार दाटला हा
घरट्यात रे पिलांचा आकांत फार झाला
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ मे २०१७
No comments:
Post a Comment