Wednesday, 12 April 2017

वेदना शब्दात मांडतो जेव्हा

वेदना शब्दात मांडतो जेव्हा
होते मन हलके कविता लिहताना
कित्येकदा पाहीलं जगाला मी
दुःख वाचत वाह-वाह बोलताना

प्रत्येक शब्दात असेल अनुभव
दोष कदाचित त्यांचाही नसेल
हलकी करणं माणसांची मनं
मला सुद्धा ते जमत असेल?

फारंच मोजकीच माणसं आहेत
दुःख दुसर्‍यांची कमी करणारी
पाहीली जगात माणसं असेही
काही न बोलता मनात झुरणारी

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ एप्रिल २०१७ 

No comments:

Post a Comment