Thursday, 1 December 2016

चेहरे

आज माझी नेहमीची ट्रेन सुटली (बदलापूरहून). दुसरी ट्रेन तब्बल ४० मिनिटांनी येणार होती.  मला आता ४० मिनिटे बदलापूर स्टेशनला थांबायचं होतं. थोडा वेळ ट्विटर, फेसबुक व WhatsApp वरचे मेसेजेस तपासून पाहिले. ते सर्व झाल्यावर आणखी काही वेळ उरला होता. फलाटावर गर्दी वाढतच होती.  खोपोली वरून ट्रेन येणार होती. त्या थोड्या वेळातच मला खुपच चेहरे वाचण्यास मिळाले. आनंदी,  दुःखी, दडपणाखाली अडकलेले, कुटुंबाची चिंता करणारे, रोज माथाडी काम करणारे म्हणजे आज काम मिळेल कि नाही? याची चिंता करणारे चेहरे, अनेक चेहरे आज मी पाहिले. आज चेहर्‍यावरचे खुप वेगवेगळे भाव वाचण्यास मिळाले.
    या दहा ते पंधरा मिनिटात मला खुप काही शिकायला मिळाले. या जगात प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात आणि त्याचा सामना स्वतःलाच करायचा असतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४/०५/२०१५

No comments:

Post a Comment