दोन मनांना व दोन कुटुंबाला एकत्र आणण्याचा सोहळा म्हणजे लग्न. एका नवीन नात्याच्या वळणावर मनात जबाबदारीची खूणगाठ बांधून विश्वासाचा हात पकडून नवीन जीवनात प्रवेश करणं म्हणजे लग्न.
आईच्या मायेने, बाबांचा आदर्श घेऊन वाढलेली लेक व खंबीर साथ असलेल्या भावाची दीदी सासरी जात आहे.
ओल्या झाल्या कडा बापाच्या
करत असता लेकीची पाठवण
गंगा यमुनाही आईच्या नयनी
मनातही आठवणींची साठवण
निघाली आहे नवरी सासरी
संभाळण्यास भार संसाराचा
नकोस करू काळजी पोरी
भाऊ आहे खंबीर आधाराचा
लेक चालली पहा सासरला
सुरू करण्यास संसार नवा
नवीन आयुष्याच्या प्रारंभास
थोर मंडळींचा आशिर्वाद हवा
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ नोव्हेंबर २०१९
No comments:
Post a Comment