खूप सांगायचं तुला, मनात सारं दडलेलं
सांग कळणार कधी, मन माझं जडलेलं
दोन पाखरं डोळ्यांची, फिरे तुझ्या भोवती
भेट होताच आपली, श्वास क्षणास रोखती
सत्य आहे कि भास, जणू स्वप्न पडलेलं
सांग कळणार कधी, मन माझं जडलेलं
वेडावून मज जाते, तुझे लाजून हासणे
काळीज चिरून जाते, तुझे चोरून पाहणे
येऊ दे ओठावरी, डोळ्यात सारं दडलेलं
सांग कळणार कधी, मन माझं जडलेलं
खूप सांगायचं तुला, मनात सारं दडलेलं
सांग कळणार कधी, मन माझं जडलेलं
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ नोव्हेंबर २०१९
No comments:
Post a Comment