पोस्टमन काका
आनंद अश्रू येणं बंद झालं
शब्दातला चेहरा आठवताना
आठवणीत रमणे बंद झालं
दुरून आलेलं पत्र वाचताना
झोळीमधल्या सुख दुःखाचं
घरी येणं आता बंद झालं
भ्रमणध्वनीच्या काळामध्ये
पोस्टमनचं येणं बंद झालं
एक पत्र लिहून पाहूया
देऊया जगण्याला मोका
घेऊन पुर्वीचे युग तुम्ही
परत या पोस्टमन काका!
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० फेब्रुवारी २०१९
No comments:
Post a Comment