Wednesday, 14 November 2018

अधूरी प्रेम कहाणी

"अधूरी प्रेम कहाणी "

इनडोअर....महाविद्यालय....दिवस...

(महाविद्यालयात एक विशेष कार्यक्रम आहे. यामुळे विद्यार्थी व विद्यार्थीनी आपले वर्ग सजवत आहे. कथेतील नायिका रोहिणी एका स्टूलचा आधार घेऊन सजावट करित उभी असताना काही विद्यार्थ्यांचा तिला धक्का लागतो ती खाली पडणार तितक्यात शेजारी उभा असलेला कथेतील नायक दर्शन तिला सावरतो. बराच वेळ दोघे एकमेकांना निरखून पाहत आहे. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत आहे.)

दर्शन- (रोहिणीला सावरत, दोन्ही हाताने आधार देत) संभाळून, कुठे लागलं तर नाही ना!

रोहिणी - नाही. तुझ्या आधारामुळे मला काहीच झालं नाही. तु जवळ होतास म्हणून मी वाचले.

दर्शन - (मनातल्या मनात बोलत होता) तुला काहीच झाले नाही पण माझ्या मनात खोलवर घाव झाला त्याचं काय?

रोहिणी - (आश्चर्यचकित होऊन दर्शनकडे पाहत) काही बोललास का?

दर्शन - (भानावर येत) नाही तर, काहीच नाही.

(दर्शन मनातल्या मनात कविता बोलू लागतो)

मला जे काही सांगायचं आहे
ते माझ्या नजरेत दाटलं आहे 
तुझ्या नजरेची भाषा वाचून
मनातलं वादळ पेटलं आहे

(दर्शन स्वतः शीच गालातल्या गालात हसू लागतो. )

..........................................................
आउटडोअर....महाविद्यालय कट्टा....दिवस...

दर्शन कट्ट्यावर बसला आहे. रोहिणी येण्याची तो वाट पाहत आहे. रोहिणी समोरून येत आहे हे पाहताच तो उभा राहतो. दोघांच्या नजरानजर होते. दर्शन रोहिणीच्या जवळ येतो.

दर्शन  - कशी आहेस?

रोहिणी- (गालात स्मित हास्य करत) मजेत. तू बाहेर काय करतोस? लेक्चरला नाही बसला.

(दर्शन आणि रोहिणी एकत्र चालत आहेत.)

दर्शन- नाही. माझं मन कशातच लागत नाही.

रोहिणी - (दर्शनकडे पाहत) का? काय झालं?

दर्शन - (रोहिणीकडे पाहत) कुठे काय! काहीच नाही.

रोहिणी - मग कशात लक्ष लागत नाही असं का म्हणालास?

दर्शन - हो, तसं विशेष आहे. सांगेन तुला वेळ आल्यावर.

(दोघे एकत्र चालत आहेत. दर्शन रोहिणीकडे एकटक पाहत आहे. ती आज खुपच सुंदर दिसत आहे. दर्शन तिच्याकडे पाहत दीर्घ श्वास घेतो व एक कविता मनातच बोलतो)

हरवलेलं मन तुझ्या प्रेमात 
तुझाच फक्त शोध घेतो
काय सांगू प्रिये तुला
भेटीचा क्षण आधार देतो

(रोहिणीही मनातच बोलते की, दर्शन तू मला आवडतोस हे मी तुला कसं सांगू!)
.........................................................

आउटडोअर....महाविद्यालय कबड्डी मैदान....दिवस

महाविद्यालयात कबड्डीची स्पर्धा रंगली आहे. या स्पर्धेत कथेतील नायक दर्शन सुद्धा आहे. एक एक करत सर्व खेळाडू बाद होतात. शेवटी दर्शन व त्यातील एक खेळाडू अजूनही बाद झालेले नाही.

दर्शन- (साथ देणाऱ्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवत) राजू, आता आपण दोघेच राहीलो आहे.

राजू - (दर्शन कडे बघत) दर्शन, तू घे एन्ट्री आणि धूळ चारून ये त्यांना.

दर्शनला धीर आला आहे. प्रेक्षक व दर्शनचे मित्र मैत्रिणी त्याला प्रोत्साहन देत आहे. सर्व बाजूंनी एकच आवाज येत आहे.

"दर्शन, दर्शन, दर्शन, दर्शन......"

दर्शन मैदानात एन्ट्री करतो. खुप हुशारीने काही खेळाडूंना बाद करून परत फिरत असताना अचानक त्याची नजर रोहिणीवर पडते. त्याचा खेळ मंद होतो. समोरचे खेळाडू त्याला बाद करतात. राजू जमीनीवर जोरात उजवा पाय दोन-तीन वेळा आदळतो.
..........................................................

आउटडोअर...महाविद्यालयाबाहेरील वाहतूक रस्ता....दिवस

रोहिणी स्कूटीने महाविद्यालयाकडे येत आहे. तिने हेल्मेट घातलेले आहे. महाविद्यालयाजवळ गाडी आल्यावर गाडीचा वेग मंदावतो. अचानक दर्शन तिच्या गाडीसमोर येतो व स्कूटी थांसवण्याचा प्रयत्न करतो. गाडी थांबली जाते.

दर्शन- (गाडी थांबवत) अगं, थांब थांब जरा.

रोहिणी- अरे काय करतोस? आत्ता पडले असते ना! वेडा आहेस का तू.

रोहिणी गाडी थांबवते

दर्शन- मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे.

दर्शनच्या मनात नेमके काय चालले आहे हे रोहिणी ने ओळखले आहे.

रोहिणी- ही काय वेळ आहे का? मी नंतर बोलते. आता मी घाईत आहे. हो बाजूला.

दर्शन- थोडं थांब ना!

गाडी पकडताना दर्शनचा अंदाज चूकतो व गाडी सहीत रोहिणी रस्त्यावर कोसळते. दर्शन तिला सावरतो. रोहिणीच्या हाताला जखम झाली आहे. हा सर्व प्रकार रोहिणीचे शिक्षक पाहत असतात. तेवढ्यात रोहिणीची नजर तिच्या शिक्षकावर जाते व ती लगेच दर्शनला बोलू लागते.

रोहिणी- इथे नको, मी तुला नंतर भेटते. तू जा येथून ताबडतोब.

तिला राग येऊ नये म्हणून दर्शन रोहिणीचे ऐकतो व काहीही न बोलता तो तेथून निघून जातो.
.............................................................

इनडोअर...महाविद्यालयातील मुख्याध्यापकाचे कार्यालय ....दिवस

मुख्याध्यापक व शिक्षक बसलेले आहेत. रोहिणी मान खाली घालून उभी आहे.

मुख्याध्यापक - रोहिणी

रोहिणी- यस सर

मुख्याध्यापक - सर काय सांगतात ते खरं आहे का?

रोहिणी- (मुख्याध्यापकाकडे पाहत रोहिणी बोलते) काय सर

मुख्याध्यापक - काॅलेजच्या बाहेर तुला अडविणारा तरूण कोण होता.

रोहिणी - (हळू आवाजात) कोण सर

मुख्याध्यापक - (शिक्षकाकठे पाहत) पाटील सरांनी मला जे काही सांगितलं आहे ते खरं आहे.

रोहिणीला काय बोलावे ते सुचेना. ती घाबरली आहे.

रोहिणी- (ओढणीचा कडा हातात घेत व मान खाली घालून) सर, मी त्या मुलाला ओळखतही नाही.

मुख्याध्यापक - (रागात व वरच्या स्वरात) खोटं बोलू नकोस. झालेला प्रकार मला समजला आहे. आपल्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून तुमचे पालक जीवाचा आटापिटा करून तुम्हाला चांगले शिक्षण देतात. असं वागतात थोडा आई-वडीलांचा विचारही तुला आला नाही का? त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये असे वागवे नेहमी. ते काही नाही तू आता सरळ घरी जा आणि ताबडतोब पालकांना घेऊन ये.

रोहिणी- पण सर...

मुख्याध्यापक - (रोहिणीचे बोलणे मध्येच थांबवत) तू तुझ्या पालकांना घेऊन आल्याशिवाय तुला आपल्या काॅलेजमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

.............................................................

इनडोअर...महाविद्यालयातील मुख्याध्यापकाचे कार्यालय ....दिवस

मुख्याध्यापक, शिक्षक, रोहिणीचे आई वडील बसलेले आहेत. रोहिणी तिच्या आईच्या उजव्या बाजूला उभी आहे. घडलेला सारा प्रकार मुख्याध्यापकांनी रोहिणीच्या पालकांना सांगितला.

मुख्याध्यापक - (रोहिणीच्या पालकांकडे पाहत) रोहिणीला विश्वासात घ्या आणि त्या मुलाची चौकशी करा. आपल्या काॅलेजचे नाव बदनाम होईल असे काही होऊ देऊ नका.

रोहिणी रडू लागते

रोहिणीचे वडील - सर तुम्ही काहीच काळजी करू नका. मी सांगतो तिला समजावून.

रोहिणीची आई - सर आमच्यावर विश्वास ठेवा. याच्यापुढे असा कोणताही प्रकार घडणार नाही. आम्ही सगळे याची काळजी घेऊ.

मुख्याध्यापक - ठीक आहे. आता तुम्ही येऊ शकता.

.............................................................

पुढील आठ-दहा दिवस रोहिणी महाविद्यालयात येत नाही. दर्शन रोज महाविद्यालयाकडे रोहिणीची वाट पाहत उभा असतो. रोहिणी काॅलेजला का येत नसावी हा विचार दर्शन सारखा करत असतो. काय करावे व काय करू नये हेच त्याला समजत नाही. शेवटी तो ठरवतो कि, रोहिणीला तिच्या घरी जाऊन भेटायचे.

आऊटडोअर...वाहतूक रस्ता ....दिवस

दर्शन रोहिणीच्या घराकडे येत आहे व त्याच रस्त्याने रोहिणी चालत आहे. दोघे एकमेकांना पाहतात. दर्शन रोहिणीजवळ येतो.

दर्शन - रोहिणी थांब जरा. माझं थोडं ऐकून तरी घे.

रोहिणी- तुझं मला काहीच ऐकायचं नाही. जा येथून निघून. झालेला तमाशा पुरे नाही का?

दर्शन- काय झाले सांगशील का मला तू.

रोहिणी- मला तुझ्याशी एक शब्द देखील बोलायची इच्छा नाही. निघून जा येथून.

दर्शन- ऐकून तरी घे थोडं. मी तुझी माफी मागण्यासाठी आलो आहे. तू मला माफ नाही करणार का?

रोहिणी जोरात दर्शनच्या गालावर मारते.

रोहिणी- नाही

तेथून रोहिणी जाण्यास वळते. दर्शन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. ती ऐकत नाही तेवढ्यात दर्शन तिचा सात ओढतो.

रोहिणी - (रागाने) माझा हात सोड

दर्शन  - अगं, मनापासून साॅरी म्हणतो ऐकून तर घे

रोहिणी  - किती वेळा सांगू मला तुझ्याशी बोलायचं नाही.

(दर्शन तिचा हात दाबून धरतो. रोहिणी तिचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करते पण हात सुटत नाही. रोहिणी दर्शनचा हात कसाबसा सोडवून घेते)

दर्शन  - (रागाने) तुला जायाचं आहे ना जा, तुझी आई घाल जा

(रोहिणी तेथून निघून जाते व तिच्या डोळ्यांत अश्रू आलेले आहेत. दर्शनला याचे खूप वाईट वाटते. )

(रोहिणी रस्ता ओलांडत असताना समोरून एक वाहन जोरात येते हे होत असताना रोहिणीचे लक्ष नसते. हे दर्शन सर्वपाहत असतो व तो तिच्या जवळ पळत जातो व तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तो तिला पाठीमागे ओढतो. रोहिणी पाठीमागे पडते व तिच्या डोक्याला मार लागतो. तिला ओढत असताना दर्शनचाही तोल जातो व गाडी दर्शनला धडकते. दर्शन व रोहिणी च्या भोवती आजूबाजूची माणसं जमा होतात. दोघेही खाली खाली पडलेली आहे. रोहिणी च्या वर्गातील एक विद्यार्थी येतो. तो सागर आहे. रोहिणीला तो रिक्षात घालून रूग्णालयात घेऊन जातो.

(दर्शनलाही काही माणसं रूग्णालयात घेऊन जातात.)

(दर्शनचा पाय अपघातात मोडतो)

(या काळात सागर आणि रोहिणीची मैत्री खुप वाढते. ते दोघेही खुप जवळचे मित्र होतात)

दहा बारा दिवसांनी....वर्गात तास सुरू असतो.

शिक्षक - जे कोणी गैरहजर आहेत त्यांना बोलवून घ्या. ही जवाबदारी गैरहजर असणाऱ्या मित्रांची आहे.

(दूसऱ्या दिवशी दर्शनचे मित्र दर्शनला महाविद्यालयात घेऊन येतात)

(दर्शन व त्याचे मित्र वर्गात बसलेले आहेत. त्यांच्याबरोबर सागरही आहे. सागर दर्शनला बोलवून घेतो)

अर्जित हा सागरचा मित्र आहे तो त्याच्याजवळ जातो आणि बोलतो.

अर्जित - (सागराला ) काय भावा कुठं गायब आहेस?

त्यांना रोहिणीची मैत्रिणी दूरूनच पाहत असते. तिचा भास होतो कि, सागरला दर्शनचे मित्र मारत आहेत व ती रोहिणी येऊन सांगते. रोहिणी दर्शनकडे येतात व तेथून त्याचे मित्र निघून जातात. रोहिणी दर्शन जवळ येते.

रोहिणी - तू एकदा माझी वाट लावलास तुझं मन बरलं नाही का. तुला समाधान होत नाही का? तुझ्यामुळे माझ्या कोणत्याही जवळच्या माणसांना त्रास होता कामा नये आणि त्रास जाला तर माझ्याशी गाठ आहे.

(हे बोलून ती निघून जाते. सागर हे सर्व दूरून पाहत आहे)

दर्शनचा मित्र ॠशी तेथे येतो

ॠशी - तू रोहिणीला काहीच कसं बोलला नाही.  तिच्यामुळे तुझा पाय मोडला, तुझं करियर खराब झालं

दर्शन -  जाऊदे भावा

(सागर हे ऐकून रोहिणी जवळ जातो आणि तिला सांगण्याचा प्रयत्न करतो. रोहिणी काहीही ऐकून घेत नाही. सागर तिला रागाने दर्शनच्या सभोर उभा करतो. )

रोहिणी - (सागरकडे पाहत) सागर, तुला माहित नाही हा मुलगा खुप चालू आहे. तू याच्या नादाला नको लागू.

रोहिणी - (दर्शनकडे पाहत) तू का माझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येण्याचा प्रयत्न करतोय. तू काहीही केलंस तरी आपलं आता नातं कधीही जुळणार नाही. निघून जा माझ्या आयुष्यातून"

(एवढं बोलून रोहिणी वळते व तेथून निघून जाते)

दर्शनला काय करावे काय नाही हेच कळेना. तो रोहिणी दूर जाईपर्यंत स्तब्ध उभा आहे व तिला पाहत आहे या दरम्यान बॅक ला एक गाणं वाजतं.

यल्लप्पा कोकणे

No comments:

Post a Comment