वृत्त - आनंदकंद
गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा
तो गंध नेहमीचा श्वासात फक्त होता
तो भाव ओळखीचा डोळ्यात फक्त होता
लोकांत वागताना आनंद देत गेलो
साराच काळ माझा दुःखात फक्त होता
शब्दातले बहाणे मी ओळखून आहे
तेव्हाच भाव माझा गीतात फक्त होता
जेव्हा निवांत होतो नात्यात राहताना
तेव्हाच जीव माझा ध्यासात फक्त होता
रात्रीत चांदण्याच्या हातात हात होता
साराच तो नजारा भासात फक्त होता
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ मे २०१७
गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा
तो गंध नेहमीचा श्वासात फक्त होता
तो भाव ओळखीचा डोळ्यात फक्त होता
लोकांत वागताना आनंद देत गेलो
साराच काळ माझा दुःखात फक्त होता
शब्दातले बहाणे मी ओळखून आहे
तेव्हाच भाव माझा गीतात फक्त होता
जेव्हा निवांत होतो नात्यात राहताना
तेव्हाच जीव माझा ध्यासात फक्त होता
रात्रीत चांदण्याच्या हातात हात होता
साराच तो नजारा भासात फक्त होता
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ मे २०१७
No comments:
Post a Comment