Thursday, 31 October 2024

उद्याची काळजी

उद्याची काळजी करत असताना रात्र जागवते आणि जवाबदारी ही सकाळी लवकर उठवते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ ऑक्टोबर २०२४

जगण्यातला आनंद

आतुरता कायम राहिली की जगण्यातला आनंद अनुभवता येतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ ऑक्टोबर २०२४

Wednesday, 30 October 2024

स्वतः ठरवलं पाहिजे

आपण जसं इतरांशी वागतो तसंच समोरची व्यक्ती आपल्याशी वागण्याचा प्रयत्न करीत असते. म्हणून स्वतः ठरवलं पाहिजे कि आपण इतरांशी कसे वागले पाहिजे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० ऑक्टोबर २०२४

नातं जपून ठेवायचं असतं

नातं जपून ठेवायचं असतं. नाहीतर कोणी आपल्याला सोडून गेल्यावर खूप काही हरवल्यासारखं वाटतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० ऑक्टोबर २०२४

Tuesday, 29 October 2024

परिस्थितीने ओरबाडलेले दुःख

परिस्थितीने ओरबडलेल्या दुःखाकडे पाहत नाराज होऊ नये. कदाचित आपल्याला घासून मौल्यवान करण्याचा परिस्थितीचा प्रयत्न असू शकतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० ऑक्टोबर २०२४

Monday, 28 October 2024

जग सोडून गेल्यावर

आठवण आली की स्वतःला त्रास करून घेऊ नये. आपण हे जग सोडून गेल्यावर लोकं आपल्याला विसरणार आहेत.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ ऑक्टोबर २०२४

Tuesday, 22 October 2024

शर्तीचे प्रयत्न

काम कोणतेही सहज पूर्ण होत नाही त्यात शर्तीचे प्रयत्न अपेक्षित असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ ऑक्टोबर २०२४

Monday, 21 October 2024

प्रयत्नाची कास

आधाराची अपेक्षा सोडून प्रयत्नाची कास धरल्यास जगण्याची उमेद निर्माण होते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ ऑक्टोबर २०२४

Thursday, 17 October 2024

सराव

सराव केला की एखाद्या गोष्टीची सवय होते आणि नंतर ती गोष्ट एक जीवनाचा भाग होऊन जाते. म्हणून कोणत्या गोष्टीचा सराव करायचा आणि कशावर दुर्लक्ष करायचं हे आपणच ठरवायचं असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ ऑक्टोबर २०२४

Monday, 14 October 2024

आत्महत्या

"आत्म" परिक्षण कमी पडले की कधी कधी स्वतःची "हत्या" करण्याची वेळ येते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ ऑक्टोबर २०२४

Sunday, 13 October 2024

संयम

धीर जरी सुटत असला तरी संयम बाळगणे गरजेचे आहे कारण संयमात विजय खेचून आणण्याची ताकद असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ ऑक्टोबर २०२४

Saturday, 12 October 2024

स्वतःचा विचार

स्वतःचा विचार केला की दुसऱ्यांची मनं दुखावली जातात आणि दुसऱ्यांचा विचार केला की स्वतःला आनंद मिळतो. 

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ ऑक्टोबर २०२४

Friday, 11 October 2024

स्मशानातील शांतता

स्मशानातील शांतता

जाणारा माणूस निघून जातो
दहनभूमी येथे दुःख कशाला
वाणीत गोडवा नसे जिवंतपणी
मग शेवटी का कोरड घशाला?

स्मशानातील भयान शांततेला
आपलं दुःख जाऊन विचारावं
दोन अश्रू गाळण्या अगोदर थोडं
आपण कसे वागलो ते आठवावं

जीवाची धडपड कोणासाठी ही
सर्वच संपणार श्वास थांबल्यावर
ध्यास असावा फक्त माणूसकीचा
काय मिळेल माणूस गमावल्यावर?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ ऑक्टोबर २०२४

Tuesday, 8 October 2024

सतत कामात व्यस्त

लोखंड एका ठिकाणी पडून राहिल्याने त्यावर गंज चढतो. नदी थांबल्यावर ती गढूळ होते. म्हणून प्रगती करायची असेल तर सतत कामात व्यस्त असणे गरजेचे आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८ ऑक्टोबर २०२४

Monday, 7 October 2024

दोन हृदय

जगताना दोन हृदय घेऊन जगावं लागतं. घराच्या बाहेरील जगात टिकण्यासाठी खंबीरपणा व घरातील आपल्या माणसांसाठी मवाळपणा घेऊन रहावं लागतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ ऑक्टोबर २०२४

Sunday, 6 October 2024

आपली वेळ

वेळ कोणासाठीही थांबलेली नाही. आपली वेळ आली की आपण सुरू व्हायचं असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ ऑक्टोबर २० २४