Sunday 23 June 2024

कावळ्याला ठेवलेला घास

आपण एखाद्याला दिलेला त्रास ती व्यक्ती जन्मभर विसरू शकत नाही. आणि त्याच व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कावळ्याला ठेवलेला घास हा माफी मागण्याचा शेवटचा दिवस माणून आपण क्षणात सर्व विसरून जातो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ जून २०२४

Thursday 20 June 2024

चमत्कारिक जगणे

ज्या गोष्टीची सवय नाही त्याचा अनुभव घेतला तर ती गोष्ट कायमची लक्षात राहते. आयुष्य चमत्कारिक जगण्यासाठी नवीन आव्हाने स्विकारण्याची तयारी असणे फार गरजेचे आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० जून २०२४

Tuesday 18 June 2024

डाव जिंकणारे

कधीच कोणाला कमी लेखू नये कारण स्पर्धेच्या युगात शांत राहून डाव जिंकणारे आपल्या वाट्याला येतच असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ जून २०२४

Monday 17 June 2024

प्रवाहाची विरुद्ध दिशा

परिस्थिती सोबत वाहत जावं लागतं तरच ध्येय गाठता येतं. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत असताना किनारा लवकर सापडत नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ जून २०२४

Saturday 15 June 2024

परिस्थितीचे गांभीर्य

आयुष्य जगताना शांत मनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून परिस्थिती सोबत जुळवून घेतल्यास जीवन जगण्यास त्रास होत नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ जून २०२४

Friday 7 June 2024

संपर्क

लोकं आपला आदर करतात की आपल्यावर नाराज आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहून सुख दुःखात सहभागी होणे फार गरजेचे आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ जून २०२४